जळगाव । महानगर पालिकेच्या सर्व अधिकारी व कर्मचारी यांना उपायुक्त यांनी आदेश काढून मोटारसायकलस्वारांना हेल्मेट तर कारचालकांना सीटबेल्ट सक्ती करण्यात आली आहे. आदेशाचे उल्लंघन केल्यास शिस्तभंगाची कारवाई करण्याचा इशारा देखील उपायुक्तांना दिला आहे. याबाबत उपायुक्तांनी काढलेल्या आदेशात म्हटले आहे की, जिल्हाधिकारी यांच्या आदेशान्वये वाहतुकीदरम्यान होणार्या अपघातात जिवीतहानी टाळण्यासाठी हेल्मेट व सीटबेल्ट सक्ती केली आहे. याबाबात लवकरच पोलिस दल व उप प्रादेशिक परिवहन विभागाकडून संयुक्त मोहीम राबवून कारवाई करण्यात येणार आहे. त्यामुळे महापालिकेच्या देखिल अधिकारी व कर्मचारी यांना हेल्मेट व सीटबेल्ट सक्ती करण्यात आली. महापालिकेत मोटारसायकल आणतांना हेल्मेट तर कार आणतांना सीटबेल्ट लावणे बंधनकारक आहे. जे कर्मचारी नियमाची अंमलबजावणी करणार नाहीत. त्यांना महापालिकेत प्रवेश देणार नाही तसेच त्याच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येणार असल्याचेही आदेशात म्हटले आहे. या आदेशाने कर्मचार्यांमध्ये खळबळ उडाली आहे.