पुणे । 24 तास पाणी पुरवठा योजनेसाठी 200 कोटींचे कर्ज काढणार्या पुणे महापालिकेच्या अधिकार्यांना आणि पदाधिकार्यांना नव्या कोर्या गाड्या हव्या आहेत. या गाड्या खरेदीसाठी 1 कोटींच्या प्रस्तावास मंगळवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली.
पुणे महापालिकेच्या वरिष्ठ अधिकार्यांना आणि पदाधिकार्यांना शासकीय कामकाजसाठी गाड्या पुरवण्यात येतात. सध्या सर्व गाड्या सुस्थितीत असताना महापालिका प्रशासनाने आणि पालिकेतील सत्ताधार्यांनी नव्या गाड्या घेण्याचा घाट घातला आहे. एकीकडे महापालिकेला पुणेकरांसाठी आवश्यक असलेल्या 24 तास पाणीपुरवठा योजनेसाठी कर्ज काढावे लागते. दुसरीकडे नव्याने समाविष्ट गावांसाठी निधीची वणवण असताना महापालिका कर्मचार्यांना आणि पदाधिकार्यांना मात्र नव्या कोर्या गाड्यातून फिरण्याची हौस पूर्ण करायची आहे.