पिंपरी : केंद्र सरकारतर्फे ज्या कर्मचार्यांना सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशी लागू करण्यात आलेल्या नाहीत. त्या केंद्रीय कर्मचार्यांना 1 जुलै 2017 पासून 136 टक्क्यांवरून 139 टक्क्यांप्रमाणे महागाई भत्ता वाढ मंजूर केली आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवड महापालिकेतील कर्मचा-यांच्या वेतन भत्त्यात तीन टक्के वाढ होणार आहे.
महापालिका कर्मचार्यांना केंद्रीय कर्मचा-यांप्रमाणे महागाई भत्ता लागू करण्याचे धोरण ठरलेले आहे. त्यानुसार, कर्मचार्यांना 1 जुलै 2017 पासून महागाई भत्तावाढ मंजूर करणे आवश्यक आहे. त्यानुसार, महापालिका कर्मचा-यांना 1 जुलै 2017 पासून सहाव्या वेतन आयोगानुसार, सुधारीत वेतन संरचनेप्रमाणे वेतन अधिक ग्रेड वेतनावर मंजूर महागाई भत्ता 139 टक्क्याप्रमाणे लागू करण्यात येणार आहे. नोव्हेंबर 2017 चे वेतन 139 टक्के महागाई भत्ता विचारात घेऊन काढण्यात यावे. तसेच जुलै 2017 ते ऑक्टोबर 2017 पर्यंत देय महागाई भत्त्याची थकबाकी नोव्हेंबर 2017 च्या वेतन देयकाबरोबर काढण्यात यावी, असे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी स्पष्ट केले आहे.