मुंबई- राज्यातील १० महापालिका, २५ जिल्हा परिषद आणि २८३ पंचायत समित्यांसाठी आज सकाळी दहा वाजेपासून मतमोजणी सुरू झाली असून एका तासात निकालाचा कल समजणार आहे.
राज्यातील १० महानगरपालिका आणि दुसर्या टप्प्यातील २५ जिल्हा परिषदा व त्याअंतर्गतच्या २८३ पंचायत समित्यांसाठी दि २१ रोजी मतदान झाले होते. या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या एकूण ३ हजार २१० जागांसाठी १७ हजार ३३१ उमेदवारांचे भाग्य मतदानयंत्रात बंद झाले होते. सकाळी दहा वाजेपासून सर्व ठिकाणी मतमोजणी सुरू झाली असून लवकरच विजयाचा कौल समजणार आहे.