महापालिका निवडणुकीची ग्रामीण भागातही रंगतेय चर्चा

0

जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, माजी आमदार सुरेशदादा जैन यांच्याकडे सूत्र असल्याने सर्वांचेचे लक्ष
युती न झाल्याने शिवसेना- भाजपमधील लढाईची सर्वांना उत्सुकता

जळगाव- राज्यात व केंद्रात सत्तेत असलेल्या भाजप- शिवसेनेची जळगाव महापालिकेतील युती फिस्कटल्याने दोनही पक्ष स्वबळावर आमने सामने लढत असून यामुळे या निवडणुकीची जळगाव जिल्ह्यातील ग्रामीण भागातही चर्चा रंगताना दिसत आहे. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन हे भाजपचे नेतृत्व करीत असून शिवसेचे नेतृत्व माजी आमदार सुरेशदादा जैन करीत असल्याने महापालिकेतील या लढाईकडे सर्वांचेच लक्ष लागून आहे.

भाजपाचे जोरदार प्रयत्न
शहर महानगरपालिकेत वर्चस्वा विषयी ग्रामीण भागात चर्चा चांगल्याच रंगत आहेत. जळगांव महापालिकेत बहूतांश वेळा सुरेशदादा जैन गटाचेच वर्चस्व राहीलेले आहे. जळगांव पालिका व सुरेशदादा हे एक समिकरणच सर्वदूर चर्चेत आहे. यावर्षी भाजपाने महापालिकेवर सत्ता मिळवणयासाठी 50 प्लसचे मिशनची आखणी सुरूवातीपासूनच केलेली आहे. राज्यातील अनेक महापालिकांमध्ये भाजपने सत्ता मिळविली असून आता जळगावातही एकहाती सत्ता मिळविण्याचे भाजपकडू होताना दिसत आहे.

युतीचीच चर्चा
महापालीकेच्या निवडणूका जाहीर होणयापूर्वीच अगोदर यूतीसाठी सर्व पर्याय बंद होते, असे म्हटले जात होत नव्हे तर बरेचसे ठिकाणी तसे चित्र होते ना. गिरीश महाजनांनी व माजी मंत्री सुरेशदादा जैन यांनी मुंबइत चर्चा केली व युती होणार असे संकेत दिले. या संकेतामुळे भाजपातील निषठावंत कार्यकर्त्यांचा गट देखिल नाराज झाला. ना. महाजन हे युती करावी या दृषिटकानातुन पहात होते तर माजी मंत्री आमदार खडसेंसह आमदार भोळेंचा देखिल या युती करणयापासून विरोधच होता. परंतु खरेतर युती हि केवळ चाचपणी होती व या युतीच्या गुगलीतुन स्वबळ वाढविणयासाठी प्रलोभन होते याची चर्चा ग्रामीण भागात केली जात आहे.

आगामी निवडणुकांची रंगीत तालीम
निवडणूक जरी महापालीकेची असली तरी प्रचारांची रंगत, त्याला दिलेले स्वरूप पाहील्यास हि निवडणूक आगामी मार्च-एप्रिल मधील लोकसभा व सप्टेबर मधील विधान सभेची रंगीत तालीमच आहे, अशी चर्चा ग्रामीण भागात आजतरी होत आहे. महापालीकेच्या निवडणूकीच्या निमीत्ताने दोन्ही भाऊंचे गट ग्रामीण पातळीवर सक्रिय झालेले आहेत. महापालीकेत मनसे पुरस्कृत खाविआ, सेना, त्यांना राषट्रवादीने दिलेला टेकु तर दुसरया बाजूस भाजपा असे चित्र नेहमीच महासभा व इतर वेळी दिसून आलेले आहे. यावेळी मात्र सत्ता भाजपाचीच हा चंग बांधुन अगदी राज्य पातळीवरील राजकीय धुरीणांनी या जिल्हयावर लक्ष केंद्रित केलेले आहे. तर ग्रामीण भागात जिल्हयाचा जिव्हाळयाचा व शैक्षणीक, सांस्कृतीकच नव्हेतर राजकीय अशा सर्वच बाबतीत शहराचे आकर्षण आहे. जिल्हा राजकारणावर बहूतांश सेना भाजपाचेच वर्चस्व आहे. त्यामुळे या निवडणुकीकडे जिल्हाभराचे लक्ष लागून आहे.