जळगाव । शहरात महापालिका निवडणूक एक महिन्यापूर्वीच जाहिर झाल्याने निवडणूकीसाठी तयार नसलेले राजकीय पक्षांमध्ये संभ्रम पहावयास मिळाला. ङ्कनपा निवडणुकीला प्रारंभ झाल्ङ्मापासून कोणत्ङ्माही पक्षाने आरोप प्रत्ङ्मारोप न करता आपण जळगाव शहराचा कसा विकास करणार आहे ङ्मावर भर दिला आहे. ङ्कात्र, ङ्मात निवडणुकीत कोणत्ङ्माही पक्षाने ङ्मुती केली नाही. काँग्रेस, राष्ट्रवादी, सपामध्ये जी आघाडी झाली आहे तीही काही जागावरच त्ङ्माङ्कुळे ङ्मुती किवा आघाडी नसल्ङ्माने सर्व पक्षानी स्वबळाचा नारा दिला असल्ङ्माने प्रचारावर भर देण्ङ्मात आला. निवडणूक प्रक्रीया जाहिर झाल्यानंतर 17 तारखेला माघारीनंतर लढतीचे चित्र स्पष्ट झाल्याने उमेदवारांनी 18 तारखेपासून प्रचारास सुरूवात केली होती तर भाजपने माघारीपूर्वीच प्रचारास सुरूवात केली होती. एकीकडे प्रचारासाठी सोशल मिडीयांचा मोठ्या प्रमाणांवर वापर झालेला पहाण्यात आला. तर दुसरीकडे नवमतदारांमध्ये जनजागृतीसाठी प्रशासनासह सामाजिक संस्थांनी पुढाकार घेवून जनजागृती केली.
खोटी आश्वासने देणार नाही
महापालिका निवडणुकीतील प्रभाग क्रमांक 1 ते 19 मधील शिवसेना उमेदवारांच्या प्रचारासाठी सोमवार 30 जुलै रोजी प्रचाराची महारॅली काढण्यात आली. यात जळगावकरांना खोटी आश्वासने देणार नाही. महापालिकेला उत्पन्नाचे स्त्रोत भरपूर आहेत. सरकारच्या मदतीविना शहराचा विकास पुन्हा एकदा करून दाखवेन. त्यासाठी जळगावकरांनी एक नव्हे, तर पुढील पाच वर्षे शिवसेनेला सत्ता द्यावी, असे आवाहन शिवसेना नेते तथा माजी मंत्री सुरेशदादा जैन यांनी केले.या रॅलीला शिवसेना कार्यालयापासून सुरूवात झाली. रॅलीच्या अग्रभागी ढोल-ताशा पथक, भगवे ध्वज घेतलेले शिवसैनिक होते. या रॅलीमध्ये पक्षाचे नेते, पदाधिकारी, सर्व उमेदवार, उद्योग, राजकारण, सामाजिक आदी विविध क्षेत्रातील मान्यवर आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. तीन खुल्या वाहनात सुरेशदादांसह पक्षाचे पदाधिकारी, 19 प्रभातील शिवसेनेचे व शिवसेना पुरस्कृत उमेदवार होते. प्रत्येकाने भगवा फेटा बांधलेला होता. रॅली शहरातील प्रमुख मार्गाने छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ पोहोचली. येथे सुरेशदादा जैन, सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील व मान्यवरांच्या हस्ते शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला.
राजूमामा म्हणजे लाईटवाले आमदार-ना.पाटील
खान्देशची मुलूखमैदान तोफ ना. गुलाबराव पाटील यांनी आपल्या खास शैलीत विरोधकांवर जोरदार टीका केली. ते म्हणाले की, महापालिका निवडणुकीत शहरविकासाची आश्वासने देणारे आणि वल्गना करणार्यांनी आतापर्यंत जळगाव शहरासाठी आणि जिल्ह्यासाठी काय केले? मागील वेळी सुरेशदादा शहरात नव्हते तरीही महापालिकेत खाविआची सत्ता आली. आता तर वाघ बाहेर आला आहे. समोरच्याला चारही मुंड्या चीत करू. टंचाईकाळात लातूरमध्ये रेल्वेने पाणी पुरविण्याची वेळ सरकारवर आली पण सुरेशदादांनी पूर्ण केलेल्या वाघूर पाणीपुरवठा योजनेमुळे जळगावकरांना दोन दिवसांआड पाणी मिळाले होते. विरोधक सांगताहेत शहरासाठी 200 कोटी रुपये आणू मात्र, इतके दिवस यांना मनाई कुणी केली होती? ते 25 कोटी रुपयेही खर्च करू शकले नाहीत. राजूमामा म्हणजे ‘लाईटवाले’ आमदार आहेत. त्यांनी केलेला एक तरी रस्ता दाखवा. खा. ए. टी. नानांनी शहरासाठी एक पैसाही दिलेला नाही. विरोधक केवळ पैशाच्या गोष्टी करतात. पण आम्ही विकले जाणार नाही. मर्दाची औलाद आहोत, अशी खरमरीत टीकाही ना. पाटील यांनी केली.
दानवेंकडे बोलण्यासारखे काही नव्हते
सुरेशदादा सरकार दरबारी जाणार नाहीत. 400 कोटी रुपये स्वतः उभे करतील आणि जळगाव शहराचा विकास करतील. शिवसेना विरोधकांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री आले नाहीत. खा. दानवे आले पण फारसे बोलले नाहीत. कारण, त्यांच्याकडे बोलण्यासारखे काहीच नाही. जळगावकरांनी फसव्या आश्वासनांनावर विश्वास न ठेवता शिवसेनेला साथ द्यावी, असे आवाहन ना. पाटील यांनी केले. रॅलीत भगवे
फेटे घातलेल्या सर्व शिवसैनिकांकडे सर्वांचे लक्ष्य वेधले होते. रॅली शिस्तबद्ध पद्धतीने मार्गक्रमीत
झाली.
यंदाची निवडणूक ऐतिहासिक
सुरेशदादा जैन म्हणाले की, जळगाव महापालिकेची यंदाची निवडणूक ऐतिहासिक आहे. विरोधक एक वर्षासाठी सत्ता मागत आहेत. शिवसेना मात्र, पाच वर्षांची संधी मागत आहे. आमच्या नगरसेवकांनी काम केले नाही तर त्यांचे कान उपटून काम करून घेईन. हा माझा शब्द आहे. महापालिकेवरील भगवा आणि महापौरपदी नगरसेवक हा शिवसेनेचाच असेल. जळगावचा विकास सन 2001 पासून मागे पडला आहे. यातून शहराला बाहेर काढण्यासाठी जळगावकरांनी शिवसेनेला सत्ता द्यावी. सन 1985 मध्येही जळगावची स्थिती भकास होती. त्यातून मार्ग काढत आम्ही शहराचा विकास केला. महापालिकेला उत्पन्नाचे स्त्रोत भरपूर आहेत. सरकारच्या मदतीविना जळगाव शहराचा विकास पुन्हा एकदा करून दाखवू, असेही सुरेशदादांनी सांगितले.