पिंपरी-चिंचवड : ‘स्वच्छ सर्वेक्षण 2018’ या चार हजार गुणांच्या ‘स्वच्छ’ परीक्षेत अग्रक्रमावर येण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून शहरवासीयांना ’स्वच्छता अॅप’ डाऊनलोड करण्याचे आवाहन केले जात आहे. आजपर्यंत 17 हजार 193 जणांनी स्वच्छता अॅप डाऊनलोड केले आहे. अॅप डाऊनलोड करण्यामध्ये पहिल्या 30 जणांच्या यादीत देखील शहराचा समावेश नाही. 31 व्या क्रमांक ावर शहराचा समावेश आहे.
अॅप डाऊनलोडलाही गुण
शहरात 4 जानेवारीपासून स्वच्छ भारत सर्वेक्षण सुरू होणार आहे. या सर्वेक्षणासाठी जनजागृती मोहीम सुरू आहे. या सर्वे क्षणातील महत्त्वाचा भाग स्वच्छता अॅप डाऊनलोड करणे हा आहे. अधिकाधिक स्वच्छता अॅप डाऊनलोड करून वापरात आले पा हिजेत. तसेच अॅपच्या माध्यमातून तक्रारी व त्यांचे संगणकीय प्रणालीव्दारे निराकरण करण्याला गुणांकन आहे. त्याचबरोबर तक्राराची वेळेत निराकरण, पालिकेचा प्रतिसाद, युजर मॅनजमेंट आणि हॅपीनेस याला देखील गुण आहेत. चांगले गुणांकन मिळवून स्वच्छ भारत अभियानात शहराला चांगला क्रमांक मिळवण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यात स्वच्छता अॅप डाऊनलोड क रण्यासाठी नागरिकांना आवाहन केले जात आहे.
35 हजाराचे टार्गेट
शहराची लोकसंख्या 17 लाख आहे. आत्तापर्यंत 17 हजार 193 जणांनी स्वच्छता अॅप डाऊनलोड केले आहे. 35 हजार अॅप डाऊ नलोड करण्याचे पालिकेचे टार्गेट आहे. स्वच्छता अॅपवरील तक्रारींचे निराकण करण्यासाठी पालिकेने स्वतंत्र स्वच्छ भारत सेल तयार केला आहे. आजपर्यंत स्वच्छता अॅपवर दोन हजार 831 तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्यापैकी दोन हजार 60 तक्रारींचे निराकरण करण्यात आले असून 79 तक्रारींवर निराकरण करण्याचे काम सुरु आहे. तर, 428 तक्रारींचे निराकरण झाले नसून 257 तक्रारी नाकारल्या आहेत.
महापालिका 31 व्या स्थानी
कानपूर, ग्वाल्हेर आणि दक्षिण दिल्ली महापालिका ’स्वच्छता अॅप’ डाऊनलोड करण्यात अग्रेसर आहेत. तर नागपूर, वसई, ठाणे, नवी मुंबई, कल्याण-भिवंडी महापालिका पहिल्या 30 मध्ये आहेत. कल्याण महापालिका 30 व्या तर पिंपरी महापालिका 31 व्या क्रमांकावर आहे. त्यामुळे स्वच्छता अॅप अधिक डाऊनलोड करण्यासाठी पिंपरी महापालिका प्रयत्न करत आहे. शहरातील सर्व मॉल, प्रादेशिक परिवहन महामंडळ (आरटीओ), पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण आणि शहरातील सर्व कंपन्यांना पा लिकेने पत्र पाठविले असून स्वच्छता अॅप डाऊनलोड करण्याचे त्यांना बंधनकारक करण्यात आले आहे.