पिंपरी- पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएमएच्)रुगणालयातील चार डॉक्टरांनी सामूहिक राजीनामे दिले आहेत. उपअधीक्षक डॉ. शंकर जाधव यांनी विनाकारण झापल्याचा आरोप करत या डॉक्टारांनी राजीनामे दिले आहेत. वायसीएमच रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. मनोज देशमुख यांच्याकडे आज (बुधवारी) डॉ. अपूर्वा , डॉ. राहुल, डॉ. अभिजित आणि डॉ. गाडेकर यांनी सामूहिक राजीनामे दिले आहेत. हे सर्व डॉक्टर तज्ज्ञ असून यांना पालिकेने एका वर्षासाठी घेतले असून हे ‘डिलिव्हरी’ विभागात कार्यरत आहेत.
याबाबतची माहिती अशी की, दोन दिवसांपूर्वी वायसीएमएच् मधील एका रुग्णाचा मृत्यू झाला होता. रुग्णावर उपचार करताना त्रुटी राहिले असल्याचे सांगत उपअधीक्षक डॉ. शंकर जाधव यांनी या सर्व डॉक्टरांना कार्यालयात बोलावून घेतले. त्यांना फैलावर घेतले. ही आमची जबाबदारी नसल्याचे या डॉक्टरांनी सांगितले. तरी देखील जाधव यांनी या डॉक्टरांना खडेबोल सुनावले. त्यामुळे या चारही डॉक्टरांनी वैद्यकीय अधीक्षक डॉ. मनोज देशमुख यांच्याकडे राजीनामे सोपविले आहेत.