निगडीतील मुलाचा शॉक लागून मृत्यूचे कारण भोवले
पिंपरी-चिंचवड : महापालिकेच्या वीज खांबाला शॉक लागून मुलाचा मृत्यू झाल्याप्रकरणी विद्युत अभियंत्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली. बापुसाहेब रोकडे असे असे त्यांचे नाव आहे. ते फ प्रभागाअंतर्गंत ओटास्कीम भागाचे विद्युत पर्यवेक्षक आहेत. या ठिकाणी 25 जून रोजी हरीओम विनायक नराल (वय 9, रा.पंचशील हौसिंग सोसायटी, ओटास्कीम, निगडी) याचा मृत्यू झाला होता.
गायीचाही मृत्यू
या घटनेनंतर महापालिका अधिकार्यांनी सदर ठिकाणचा विद्युत प्रवाह खंडित केला. त्यानृतर याच ठिकाणी आणखी एका गायीचा विजेच्या झटक्याने मृत्यू झाला होता. या घटनांवरून महापालिका सर्वसाधारण सभेत नगरसेवकांनी प्रशासनावर हल्ला चढविला. त्यानंतर महापौर नितीन काळजे यांनी चौकशीचे आदेश दिले होते. त्यानंतर चौकशी करून विद्यूत विभागाचे सहशहर अभियंता प्रवीण तुपे यांनी अहवाल दिला. त्या प्रमाणे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी विद्यूत पर्यवेक्षक रोकडे यांच्यावर निलंबनाची कारवाई केली. तसेच, त्यांच्या खातेनिहाय चौकशीचे आदेश दिले आहेत.