महापालिका शाळांच्या खासगीकरणाची अर्थसंकल्पात तरतूद

0

मुंबई । मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागाचा सन 2018 – 19 चा अर्थसंकल्प अतिरिक्त आयुक्त आबासाहेब जर्‍हाड यांनी शिक्षण समिती अध्यक्ष शुभदा गुडेकर यांच्याकडे सादर केला. सन 2018 – 19 चा अर्थसंकल्प एकूण 2569. 35 कोटींचा असून गेल्या वर्षीपेक्षा 257. 69 कोटी अधिक आहे. यामध्ये महसुली अर्थसंकल्प 2183. 71 कोटी, तर भांडवली बजेट 385. 64 कोटींचे आहे. या अर्थसंकल्पात महापालिकेच्या एकूण 35 शाळा खासगीकरणाच्या माध्यमातून चालविल्या जाणार असून अशा प्रकारे महपालिकेने शाळांच्या खासगीकरणास मंजुरी दिली आहे.

पोषण आहार पुन्हा होणार सुरू
सन 2018 – 19 च्या शिक्षण खात्याच्या अर्थसंकल्पात गेल्या पाच वर्षांपासून महापालिका विद्यार्थ्यांचा बंद असणारा पूरक पोषण आहार पुन्हा सुरु करणार असून यामध्ये प्रथिनयुक्त सुका मेवा किंवा तत्सम पौष्टिक खाद्यपदार्थ देण्यात येणार आहे. याकरिता प्राथमिकसाठी 25 कोटी, तर माध्यमिकसाठी 2.38 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून महापालिकेच्या 381 शालेय इमारतींमध्ये एकूण 4064 सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार असून यासाठी 5 कोटींची तरतूद प्रस्तावित केली.

विद्यार्थिनींसाठी सॅनिटरी वेंडिंग व बर्निंग मशीन बसवणार
मुंबई महापालिकेकडून यावेळी महापालिका शाळातील 6वी ते 8वी विद्यार्थिनींकरिता 345 इमारतींमध्ये सॅनिटरी वेंडिंग मशीन व सॅनिटरी बर्निंग मशीन बसवण्यात येणार आहे. प्राथमिकसाठी 2 कोटी तर माध्यमिकसाठी 50 लाखांची तरतूद करण्यात आली आहे.

महापालिका शाळांचे खासगीकरण
विद्यार्थ्यांची कमी झालेली किंवा अजिबात नसलेली पटसंख्या यामुळे बंद झालेल्या 35 शाळांच्या वर्गखोल्यांमध्ये खासगी लोकसहभागाने झ झ झ 35 नवीन शाळा सुरू करण्यात येणार आहे. सादर शाळा या केंद्रीय मंडळ उइडउ व आंतरराष्ट्रीय मंडळ खइ, खॠउडए, खउडए यांच्याशी संलग्न असणार आहेत, या शाळा चालविण्यासाठी नामांकित संस्थेकडून तसेच सी एस आर उडठ निधीचा अवतार केला जाणार आहे.

शिक्षण विभागाच्या अर्थसंकल्पातील ठळक वैशिष्ट्ये
पालिका शाळांमध्ये सीसीटीव्ही
विद्यार्थ्यांसाठी पोषण आहार
24 विभागांमध्ये 24 आंतराष्ट्रीय दर्जाच्या शाळा
ई वाचनालय
लेखन कौशल्यासाठी अक्षर शिल्प
उर्दू अध्यापक विद्यालयांमध्ये शिक्षक भरतीस मान्यता