महापालिका शाळेतील 18 विद्यार्थी लखपती होणार !

0

पिंपरी-चिंचवड : 80 टक्यांहून अधिक गुण प्राप्त केलेल्या दहावीच्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे बक्षिस देण्यात येणार आहे. त्यासाठी महापालिकेच्या शाळेतील 63 विद्यार्थी पात्र ठरले आहेत. यामध्ये 90 टक्यांहून अधिक गुण घेणा-या विद्यार्थ्यांना एक लाख रुपयांचे बक्षीस देऊन गौरविण्यात येणार आहे. त्यासाठी 18 विद्यार्थी पात्र ठरले आहेत.

90 टक्केवारीला एक लाख
पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे 80 टक्यांहून अधिक गुण घेणा-या विद्यार्थ्यांचा बक्षिस देऊन सत्कार केला जातो. 90 टक्यांहून अधिक गुण प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांला एक लाख, 85 टक्क्यांहून अधिक गुण प्राप्त केलेल्या 50 हजार रुपये आणि 80 टक्यांहून अधिक गुण प्राप्त केलेल्या विद्यार्थ्याला 25 हजार रुपये देऊन गौरविण्यात येते.

शाळांचेही उत्तुंग यश
महापालिकेच्या 18 शाळा आहेत. यापैकी पिंपळेसौदागर येथील माध्यमिक विद्यालयातील सहा, पिंपळेगुरव माध्यमिक विद्यालयातील पाच, भोसरी आणि निगडी माध्यमिक विद्यालयातील दोन, चिंचवड, आकुर्डी आणि काळभोरनगर या माध्यमिक विद्यालयातील प्रत्येकी एका विद्यार्थ्यांनी 90 टक्क्यांच्या पुढे गुण प्राप्त केले आहेत. यांना एक लाख रुपयांचे बक्षीस देऊन गौरविण्यात येणार आहे.

25 हजार ते एक लाख बक्षीस
85 टक्क्यांहून अधिक गुण मिळविलेल्यांमध्ये पिंपळे सौदागर येथील माध्यमिक विद्यालयातील सात, कासारवाडी चार, निगडी दोन, पिंपरीनगर, पिंपळेगुरव, लांडेवाडी, नेहरुनगर आणि संत तुकारामनगर माध्यमिक विद्यालयातील प्रत्येकी एका विद्यार्थ्याला 85 टक्क्यांहून अधिक गुण मिळाले आहेत. यांना 50 हजार रुपयांचे बक्षिस देऊन गौरविण्यात येणार आहे. तर, पिंपळेसौदागर, केशवनगर माध्यमिक विद्यालयातील प्रत्येकी सहा, कासारवाडी, क्रीडा प्रबोधीनी विद्यालयातील प्रत्येकी चार, रुपीनगर तीन, निगडी दोन, काळभोरनगर, भोसरी आणि संत तुकारामनगर माध्यमिक विद्यालयातील प्रत्येकी एका विद्यार्थ्यांना 80 टक्यांच्या पुढे गुण प्राप्त झाले आहेत. या विद्यार्थ्यांना 25 हजार रुपयांचे बक्षीस देऊन गौरविण्यात येणार आहे.