पुणे : महापालिका तब्बल 5000 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना एकाच वेळी पर्यावरणपूरक शाडूच्या मातीचे गणपती बनविण्याचे प्रशिक्षण देऊन विक्रम करणार असून त्याची नोंद गिनीज बुकमध्ये केली जाईल, यासाठी महापालिका सज्ज असून आज या उपक्रमाची सुरुवात झाली, असे स्थायी समितीचे अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले.
पंडित दीनदयाळ उपाध्याय शाळेतील विद्यार्थ्यांना पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी शाडूच्या मातीचे गणपती बनविण्याचे प्रशिक्षण देण्यासाठी क्रिएटिव्ह फाउंडेशन आणि नगरसेविका मंजुश्री खर्डेकर यांनी कार्यशाळा आयोजित केली होती.