शहरातील विकासाच्या दृष्टीने या कामांना मिळाली मान्यता
पिंपरी : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने शहरातील विविध विकास विषयक कामे करण्यासाठी येणार्या सुमारे 19 कोटी 41लाख 96 हजार रुपयांच्या खर्चास स्थायी समितीने मान्यता दिली आहे. रस्ते विकास, जल निःसारण कामे, पाणी पुरवठा, विद्युत विषयक कामे आदी कामांचा यामध्ये समावेश आहे. शहरातील विकासाच्या दृष्टीने ही मंजुरी दिल्याचे स्थायी समिती अध्यक्ष सीमा सावळे यांनी सांगितले.
विठ्ठलनगर येथे पाणीपुरवठा कामे!
शहर झोपड़पट्टी पुनर्वसन अंतर्गत विठ्ठलनगर येथील प्रकल्पामधील इमारतीमध्ये स्थापत्य विद्युत, पाणीपुरवठा व जलनिःसारण विषयक कामांची दुरूस्तीची कामे करण्यासाठी येणार्या सुमारे 2 कोटी 7 लाख 72 हजार रुपयांच्या खर्चास, काळेवाडी फाटा ते देहू आळंदी रस्ता या बीआरटीएस रस्त्यावरील विविध सेवा वाहिन्यांसाठी खोदलेला रस्ता व पदपथ यांचे चर पुर्ववत करण्यासाठी येणार्या सुमारे 64 लाख 77 हजार रुपयांच्या खर्चास, टेल्को रस्त्यावरील थरमॅक्स चौक ते केएसबी चौक पर्यंतच्या रस्त्याचे डांबरी करणे व स्थापत्यविषयक कामे करण्यासाठी येणार्या सुमारे 4 कोटी 20 लाख 19 हजार रुपयांच्या खर्चास बैठकीत मान्यता देण्यात आली.
मलनिःसारण कामांसाठी!
दापोडीतील बुध्दविहार शेजारील मोकळया जागेत उद्यान विकसित करण्यासाठी येणार्या सुमारे 71 लाख 68 हजार रुपयांच्या खर्चास, थेरगाव परिसरातील नाल्यांमधील मलनिःसारण नलिकांची सुधारणा कामे करणे इतर अनुषंगिक कामे करण्यासाठी येणार्या सुमारे 40 लाख 46 हजार रुपयांच्या खर्चास, चिंचवड मैलाशुध्दीकरण केंद्रातंर्गत आहेर नगर गिरिजा हौ.सोसायटी व इतर परिसरातील जलनिःसारण विषयक सुधारणा कामे करणे व उर्वरीत ठिकाणी जलनिःसारण नलिका टाकण्यासाठी येणार्या सुमारे 43 लाख 13 हजार रुपयांच्या खर्चास, आकुर्डी मैलाशुध्दीकरण केंद्राअंतर्गंत आकुर्डी गावठाण, गंगानगर परिसरात जलनिःसारण नलिका सुधारणा विषयक कामे करण्यासाठी येणार्या सुमारे 34 लाख 65 हजार रुपयांच्या खर्चास, दापोडी पंपिंग स्टेशन अंतर्गत येणार्या जुन्या मलनिःसारण नलिका आवश्यक त्याठिकाणी बदलण्यासाठी येणार्या सुमारे 36 लाख 80 हजार रुपयांच्या खर्चास, दापोडी येथील मैला शुध्दीकरण केंद्राची देखभाल करण्यासाठी येणार्या सुमारे 2 कोटी 7 लाख 4 हजार रुपयांच्या खर्चास बैठकीत मान्यता देण्यात आली.
भोसरीमध्ये डांबरीकरण!
भोसरी, गवळीनगर मधील गवळी बंगला ते गवळी उद्यान पर्यंतचा 18 मीटर डीपी रस्ता डांबरीकरण करण्यासाठी येणार्या सुमारे 53 लाख 27 हजार रुपयांच्या खर्चास, कासारवाडी 40 द.ल.लि. मैलाशुध्दीकरण केंद्र टप्पा 1 चे चालन, देखभाल व दुरुस्ती करण्यासाठी येणार्या सुमारे 2 कोटी 5 लाख 15 हजार रुपयांच्या खर्चास, फुगेवाडी स्मशान भुमी कडेचा डीपी रस्ता करण्यासाठी येणार्या सुमारे 44 लाख 48 हजार रुपयांच्या खर्चास बैठकीत मान्यता देण्यात आली.
ट्रान्सफॉर्मर व अन्य कामे!
मनपाच्या मैलाशुध्दीकरण केंद्र व पंपिंग स्टेशनमधील वाढलेल्या वीज भारानुसार उर्जा बचतीकामी ट्रान्सफॉर्मर बसविणे व आवश्यक विद्युत विषयक कामे करण्यासाठी येणार्या सुमारे 28 लाख 40 हजार रुपयांच्या खर्चास, मनपाच्या मैलाशुद्धीकरण केंद्रे व पंपीग स्टेशनमध्ये अचानकपणे वीजपुरवठा खंडीत झालेस विद्युत पुर्ववत करण्यासाठी येणार्या सुमारे 41 लाख 48 जार रुपयांच्या खर्चास, पडवळनगर, पवारनगर परिसरात दुषित पाणी तक्रार निवारण करणेकामी नविन पाणीपुरवठा नलिका पुरविणे व टाकण्यासाठी येणार्या सुमारे 31 लाख 18 हजार रुपयांच्या खर्चास, बैठकीत चिखली येथील मोरे वस्ती परीसरात टॉवर लाईन व नवीन विकसित भागात आवश्यकतेनुसार पाईपलाईन टाकणे व इतर अनुषंगिक कामे करण्यासाठी येणार्या सुमारे 30 लाख रुपयांच्या खर्चास, 3 चर्होली डुडुळगाव व येथील स्मशानभूमीची सुधारणा व स्थापत्य विषयक कामे रण्यासाठी येणार्या सुमारे 2 कोटी 8 लाख 76 हजार रुपयांच्या खर्चास बैठकीत मान्यता देण्यात आली.