महापालिका 8 कोटींच्या औषधांची खरेदी करणार

0

पुणे : महापालिकेकडून शहरी-गरीब आरोग्य योजना तसेच पालिकेच्या रुग्णालयांसाठी दरवर्षी औषध खरेदी करण्यात येते, यंदाच्या वर्षी महापालिकेच्या तब्बल आठ कोटी रुपयांची औषध खरेदी करणार आहे. या प्रस्तावाला स्थायी समितीने मंजुरी दिले आहे. त्यामुळे रुग्णालयातील औषधे टंचाई दूर होण्यास मदत होणार आहे.

महापालिकेच्या शहरी-गरीब आणि अंशदायी वैद्यकीय साह्य योजनेअंतर्गत औषध खरेदीची प्रक्रिया सुरू करण्यात आली. या प्रक्रियेपाठोपाठ आता महापालिकेची सर्व रुग्णालये आणि दवाखान्यांना लागणार्‍या औषधांसाठी एकत्रित औषधे खरेदीची प्रक्रिया सुरू झाली. त्या अंतर्गत आठ कोटी रुपयांची औषधे खरेदी करण्यात येणार आहे. त्यासाठी 14 जणांनी निविदा भरल्या आहेत. ही खरेदी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर महापालिका रुग्णालयांचा औषध पुरवठा सुरळीत होण्यास मदत होत आहे. औषध खरेदीचा प्रस्ताव स्थायी समिती पुढे ठेवण्यात आला होता त्याला मंजुरी मिळाली आहे.