महापालिकेचा अटल शास्त्र मार्केनॉमी अवॉर्डने गौरव

0

एनर्शिया फाऊंडेशनतर्फे पुरस्कार जाहीर

पिंपरी : मार्केनॉमी संस्थेच्यावतीने एनर्शिया फाऊंडेशन आणि फॅल्कन मिडीया यांच्या सहकार्याने शहरातील पाणीपुरवठा, पर्यावरण, वीज आणि पायाभूत सुविधा या सेवांबाबत केलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल पिंपरी-चिंचवड महापालिकेला ‘मार्केनॉमी’ पुरस्कार देण्यात आला. हा पुरस्कार महापालिकेचे सह -आयुक्त दिलीप गावडे यांनी स्वीकारला.मुंबईतील रवींद्र नाट्य मंदिर येथे चौथा अटल शास्त्र मार्केनॉमी अवॉर्ड नुकताच पार पडला.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून वैज्ञानिक आणि शिक्षणतज्ज्ञ पद्म विभूषण प्रा. एम. एम. शर्मा, मार्केमॉनी फाऊंडेशनचे अध्यक्ष सुरेश शर्मा, उद्योजक शशांक शाह, मायक्रोटेक ग्लोबल फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ. पी. शेखर, ट्रान्स एशिया चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीचे मुख्य समन्वयक-इन- चीफ व सचिव संजय भिडे, सामाजिक कार्यकर्ते नंदकिशोर नौटियाल, माजी संपादक हिंदी बीएलआयटीझेड आणि अध्यक्ष व नूतन सवेरा पब्लिकेशन्स लि.-तामल बांडोपाध्याय, सीनियर बिझिनेस स्तंभलेखक संतोष कुमार चौहान आदी उपस्थित होते. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या नावाने या पुरस्काराचे नामांकन करण्यात आले आहे. मार्केनॉमी फाउंडेशचे दिवंगत अध्यक्ष प्रकाश अय्यर, माजी कार्यकारी प्रकाशक आणि संपादक यांचे स्मरणार्थ हा पुरस्कार दिला जातो.

पिंपरी-पुणे प्रथम क्रमांक
शहरामध्ये उत्तम पायाभूत सुविधा देण्यासाठी हा पुरस्कार मिळतो. सुविधा, नियोजनबध्द शहर आणि स्वच्छतेसाठी पुणे महापालिका व पिंपरी-चिंचवड महापालिकेला प्रथम क्रमांकाचे सह-विजेते म्हणून प्रतिष्ठित राष्ट्रीय, स्वच्छ भारत सिटी पुरस्कार, स्मृतीचिन्ह देऊन गौरविण्यात आले. पुणे महापालिकेचे सह आयुक्त सुरेश जगताप, पिंपरी महापालिकेचे सह आयुक्त दिलीप गावडे यांनी हा पुरस्कार स्वीकारला.