महापालिकेचा वैद्यकीय विभाग बंद करावा-नगरसेविका माया बारणे

0

थेरगावमधील गुजरनगर, संतोष नगर, बेलठीकानगर भागात भटक्या जनावरांनी अक्षरश: हैदोस घातला आहे. या जनावरांचा बंदोबस्त करण्यात पशू वैद्यकीय विभाग अपयशी ठरला आहे. त्यामुळे हा विभागच बंद करून टाकावा. गेल्या काही दिवसांपासून शहरात पावसाने चांगलाच जोर धरला आहे. यामुळे कचराकुंडी व आडोशाच्या मोकळ्या जागेत डुकरे, भटकी कुत्री यांनी ठाण मांडलेले दिसून येत आहे. त्यामुळे या परिसरात दुर्गंधी पसरते आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला मोठा धोका निर्माण झाला आहे. महापालिकेच्या पशूवैद्यकीय विभागाकडे या भटक्या जनावरांचा बंदोबस्त करण्याची वेळोवेळी मागणी केली आहे. मात्र, या विभागाकडून या मागणीवर कोणतही कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे भटक्या जनावरांचा बंदोबस्त करण्यात अपयशी ठरलेला पशूवैद्यकीय विभाग कायमचा बंद करावा. ही जनावरे नागरिकांना खूप त्रास देतात. अनेकदा कुत्र्यांमुळे जखमी झालेले नागरिक दिसून येत आहेत. तरीही महापालिकेचा पशू वैद्यकीय विभागाकडून काही उपाय योजना करण्यात मागे पडतो आहे. त्यामुळे या महापालिकेने हा विभाग बंद करावा.