तडजोडीसाठी जुलैपासून निविदा स्थगित
पुणे । जीएसटीमुळे महापालिकेची थांबविलेली कामे पुन्हा सुरू करण्याचा निर्णय राज्यशासनाने घेतला आहे.
जीएसटीच्या तडजोडीसाठी जुलैपासून निविदा मागविणे किंवा कामाची ऑर्डर देणे याला राज्यशासनाने स्थगिती दिली होती. त्यामुळे महापालिकेची कोट्यवधीची कामे खोळंबली होती. शिवाय नवीन निविदा प्रक्रिया सुरू करणे हे जिकिरीचे काम प्रशासना पुढे उभे राहिले होते. आणि कामे थांबल्यामुळे नगरसेवकही नाराज झाले होते. नवीन प्रक्रिया सुरू करायची झाल्यास चार महिन्यांचा कालावधी गेला असता. पालिकचे अंदाजपत्रक ही कोसळले असते. आणि शहरात विकासकामे ठप्प झाल्याने विचित्र परिस्थिती निर्माण झाली असती.
स्थगिती मागे
या सगळ्याची दखल घेऊन राज्य शासनाने काम स्थगितीचे परिपत्रक मागे घेतले आहे. कामाची छाननी करून निर्णय घ्यावेत; असे आयुक्तांना कळविले आहे. विकासकामे मार्गी लागल्याने नगरसेवकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.