पिंपरी-चिंचवड : जागतिक तायक्वांदो स्पर्धेसाठी निवड झालेल्या नम्रता सुनील तायडे या ज्युदोपटूला महापालिकेच्या वतीने आर्थिक मदत करण्यात आली. सभागृह नेते एकनाथ पवार यांच्या हस्ते तिला 71 हजार रुपयांचा धनादेश देण्यात आला. यावेळी नगरसेवक शत्रुघ्न काटे उपस्थित होते.
शहरात आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू तयार करण्यासाठी क्रीडापटूंना प्रोत्सहन देण्यासाठी विविध सुविधा पुरविल्या जातात. याअंतर्गत तिला ही मदत दिली.