महापालिकेची मेगा कारवाई

0

कल्याण : कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या पालिका हद्दीत प्लास्टिक बंदी लागू केली असून प्लास्टिक पिशव्या वापरणार्‍या व्यापर्‍यांवर दंडात्मक कारवाई करण्यात सुरुवात केली आहे. दोन आठवड्यात 1615 किलो प्लॉस्टिक पिशव्या जप्त करत 1 लाख 18 हजार 950 इतका दंड वसूल केला आहे.

कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेने 15 जुलैपासून प्लॉस्टिक बंदीचा निर्णय घेतला असून या निर्णयाची कठोरत्तम अंमलबजावणी महानगरपालिका क्षेत्रात सुरु केली आहे. पालिका प्रशासनाने 15 जूलै ते 29 जुलै दरम्यान आरोग्य विभागाचे कर्मचारी दुकानांमध्ये, हातगाडी वाले, भाजी विक्रेते यांच्याकडे तब्बल 1615.50 किलो प्लॉस्टिक पिशव्या जप्त केले असून, त्यांच्याकडून 1 लाख 18 हजार 950 रुपये इतका दंड वसूल केलेला आहे. महापालिकेने हे अभियान राबविण्यास सुरुवात केल्यापासून कल्याण व डोंबिवली येथील भाजी विक्रेत्यांनी देखील प्लॅस्टिक बंदिचे समर्थन केले असून महापालिकेच्या उपक्रमांस प्रतिसाद देत असल्याची माहिती प्रशासनाने दिली