पिंपरी चिंचवड : महापालिकेच्या अभियंत्यांना भरमसाठ पगार दिले जात असताना अनेक छोट्या मोठ्या कामांना सल्लागाराची नेमणूक करण्याचा घाट सत्ताधारी भाजपने घातला आहे. महापालिकेकडून या सल्लागारांवर प्रकल्प रकमेच्या सव्वा ते तीन टक्के रुपयांची उधळपट्टी केली जात आहे. मंगळवारी झालेल्या स्थायी समितीच्या सभेत यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयाच्या फर्निचर कामासाठी सल्लागाराच्या नेमणुकीस मंजुरी देण्यात आली.
हे देखील वाचा
तसेच वाकड येथील उद्यान विकास, ह क्षेत्रीय कार्यालयांतर्गत क्रांती चौक ते शनिमंदिरपर्यंत रस्ता विकसित करणे, नेहरुनगर येथील मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियममध्ये पॉलिग्रास टाकणे, दापोडीतील हुतात्मा भगतसिंग शाळेचे नुतनीकरण, सांगवीतील रस्त्याचे नुतनीकरण तसेच ब प्रभागातील विविध विकास कामांसाठी सल्लागार नेमण्यास स्थायी समितीने मंजुरी दिली आहे. तसेच वाकड येथे उद्यान विकसित करण्यासाठी वास्तू विशारद नेमणूक अशा एकूण नऊ विषयांना स्थायी समितीने यावेळी मंजुरी दिली.