महापालिकेची स्पर्धा परिक्षा केंद्रे अद्ययावत करा

0
महापौर जाधव यांच्या अधिकार्‍यांना सूचना
पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेची स्पर्धा परिक्षा केंद्र अद्ययावत करण्याच्या सूचना महापौर राहुल जाधव यांनी अधिकार्‍यांना दिल्या. तसेच स्पर्धा परिक्षा केंद्राबाबत लवकरच आयुक्तांसोबत एकत्रित बैठक घेऊन शहरातील सर्व स्पर्धा परिक्षा केंद्र अद्ययावत करण्यात येथील, असेही महापौर जाधप यांनी सांगितले. महापौर जाधव यांनी महापालिकेच्या ‘फ’ क्षेत्रीय कार्यालया अंतर्गत असलेल्या मिळकती, उद्याने, क्रीडांगणे, समाज मंदीर, सांस्कृतिक हॉल, स्पर्धा परिक्षा केंद्र यांना भेट दिली. त्यावेळी महापौर जाधव यांनी सूचना दिल्या. सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार, ‘फ’ प्रभाग अध्यक्षा कमल घोलप, नगरसदस्य प्रविण भालेकर, पंकज भालेकर, सचिन चिखले, संजय नेवाळे, नगरसेविका योगिता नागरगोजे, कार्यकारी अभियंता श्रीकांत सवणे, प्रविण घोडे, मनोज शेठीया, मुख्य उद्यान अधिक्षक सुरेश साळुंखे, प्रशासन अधिकारी प्रभावती गाडेकर उपस्थित होते.
मिळकतींची पाहणी केली
‘फ’ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत असलेल्या सद्गुरू दत्त उद्यान यमुनानगर, केशवराव ठाकरे क्रीडा संकुल, मीनाताई ठाकरे व्यायामशाळा, बिंदु माधव ठाकरे व्यायमशाळा, माधव सदाशिव घोळवलकर सांस्कृतिक हॉल, मधुकर पवळे क्रीडांगण, अण्णाभाऊ साठे सांस्कृतिक हॉल, स्पर्धा परिक्षा केंद्र व वाचनालय निगडी, हनुमान जिम, से.नं.22 उद्यान, क्रांतिवीर लहुजी वस्ताज साळवे समाज मंदीर तळवडे, इंदिरा गांधी उद्यान पाटीलनगर, नागेश्‍वर विद्यालया जवळील क्रीडांगण, कै.गजानन म्हेत्रे उद्यान, पूर्णानगर शनि मंदीर येथील क्रीडांगण इत्यादी ठिकाणी भेटी देऊन मिळकतींची पाहणी केली. उद्यानामध्ये ओपन जीम बसविणे, क्रीडांगणावर लाईटची व्यवस्था करणे, स्वच्छता मोहिमे अंतर्गत वॉर्डात स्वच्छता राखणे, दररोज साफसफाई करणे, राडारोडा उचलणे, निगडीमध्ये विविध ठिकाणी अस्वच्छता आहे, ती स्वच्छ करण्यात यावी. क्रीडांगणे विकसित करावेत, अशा सूचना महापौर राहुल जाधव यांनी संबंधित अधिकार्‍यांना दिल्या.