पिंपरी-चिंचवड :- 28 एप्रिल ते 1 मे दरम्यान सुट्टीच्या कालावधीत पालिकेचे ऑनलाईन कामकाज बंद राहणार असल्यामुळे महापालिकेचे ‘सर्व्हर’ नव्याने डेटा सेंटरमध्ये कार्यान्वित करण्याचे कामकाज चालू आहे.पालिकेचे बहुतांश कामकाज ऑनलाईन पद्धतीने चालते. त्यामध्ये मिळकत कर भरना, पाणीपट्टी, विवाह नोंदणी, परवाना, जन्म-नोंदणी संगणक प्रणाली, निविदा प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने राबविली जाते.
पालिकेचे ऑनलाईन कामकाज चार दिवस बंद राहणार त्यामुळे पालिकेच्या सर्व संगणक प्रणालींशी निगडीत ऑनलाईन कामकाज व त्या अनुषंगिक सर्व ऑनलाईन सेवा बंद राहणार आहेत, असे महापालिकेने प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.