महापालिकेच्या अनिर्बंध पाणी उपशावर सरकारची बंदी

0

शहराची पाणी समस्या अधिक तीव्र होण्याची शक्यता

पिंपरी-चिंचवड : महापालिकेकडून सुरु असलेल्या अनिर्बंध पाणी उपशावर राज्य सरकारने मनाई केली आहे. पवना नदीपात्रातून 500 एमलडी नव्हे तर 470 एमलडीच दैनंदिन पाणी उपसा करा, असे आदेश राज्य सरकारने पालिकेला बजावला आहे. त्यामुळे शहराची पाणी समस्या अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.

पिंपळेसौदागर, पिंपळेगुरव, चिंचवड, चिखली, वाकड परिसराची लोकसंख्या झपाट्याने वाढली आहे. त्यामुळे 470 एमएलडी पाणी कमी पडत आहे. त्यासाठी अधिकचे 50 एमलडी पाणी उचलणे गरजेचे आहे. पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन जुनी झाली आहे. नळ कनेक्शन नादुरुस्त झाले आहेत. अनधिकृत नळ जोडणी अधिक आहे. व्यावसायिक, शिक्षण संस्थामध्ये असलेली अनधिकृत नळ कनेक्शन तोडण्यात येणार आहेत.

270 ऐवजी 450 एमएलडी
पाईपलाईन दुरुस्तीची कामे झाल्यास 270 एमलडीमध्ये शहराची तहान भागू शकते, असा विश्‍वासही त्यांनी व्यक्त केला. तसेच अनधिकृत नळ कनेक्शन अधिकृत करण्यासाठी ’पॉलिसी’ आणण्याचे काम सुरु आहे. पुणे महापालिकेतर्फे वाघोलीतील पाणी योजनेचा नवीन प्रकल्प सुरु करण्यात येणार आहे. तात्पुरत्या स्वरुपात वाघोलीतून दिघी, मोशी, चिखली परिसराठी पाणी आणण्याचे नियोजन आहे. त्यासाठी पाठपुरावा सुरु आहे. शहराच्या काही भागात पाण्याची टंचाई आहे. पाण्याचे नियोजन कोलमडले की पाण्याची समस्या उद्भवते. पाणी उपलब्धता वाढविणे मोठे आव्हान आहे. आंद्र, भामा-आसखेड धरणातून पाणी आणण्याचे प्रकल्पाचे काम सुरु करण्यात येणार आहे. त्यासाठी सल्लागाराची नियुक्ती करण्यात आली आहे.

पाणी मुरते कुठे : सावळे
शहराच्या काही भागात पाण्याची समस्या असल्याचे मान्य करत स्थायी समिती अध्यक्षा सीमा सावळे म्हणाल्या, गेल्या अनेक वर्षांपासून नदीपात्रातून दिवसाला 450 एमएलडी पाणी उचलले जात आहे. पाणी सोडणारे तेच लोक आहेत. पाणी कुठे मुरते हे शोधणे गरजेचे आहे. विरोधी पक्षनेते योगेश बहल म्हणाले, शहरवासियांना वेळेत आणि मुबलक पाणी मिळणे गरजेचे आहे. पूर्वी आम्ही 500 एमलडी पाणी दिवसाला उचलत होतो. आता 450 एमलडी पाणी उचलले जात आहे. राजकीय वजन वापरुन अधिकचे पाणी उचलण्याची गरज आहे. पाण्याची दुसरी सोय होत नाही. तोपर्यंत 30 ते 40 एमएलडी पाणी अधिक उचलावे.