जळगाव : मनपाच्या मलेरिया विभागात कार्यरत असलेल्या कर्मचार्याच्या घरावर तरुणांनी दगडफेक केल्याची घटना दि. 15 रोजी सायंकाळी 5:30 वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी शहर पोलीस स्टेशनला तक्रार दाखल करण्यात आली आहे.
याबाबत माहिती अशी की, मनपाच्या मलेरिया विभागात कार्यरत असलेले फारुक कादरी हे शिवाजी नगर परिसरातील उस्मानिया पार्क भागात रहिवासास आहे. त्यांच्या घरा जवळ मोठ्या प्रमाणात मोकळी जागा असून या ठिकाणी काही टारगत तरुण एकत्र येवून मद्यप्राशन करत असतात. सोमवारी नेहमीप्रमाणे काही तरुण याठिकाणी बसलेले असतांना कादरी यांनी तरुणांना हटकले होते. या गोष्टीचा राग मानत 4 ते 5 तरुणांनी कादरी यांच्या घरासमोर येत त्यांचा मुलगा उजेफ कादरी याला मारहान करण्यास सुरुवात केली. उजेफ याने स्वत:ला त्यांच्या तावडीतून सोडवत घरात घुसला. उजेफ हा घरात गेल्यानंतर या तरुणांनी घरावर दगडफेक करण्यास सुरुवात केली. याच वेळी खिडकीत ठेवलेले कुलर व अंगणातील पाण्याची टाकी या तरुणांनी फोडत दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान फारुक कारदी हे गावात होते त्यांच्या पत्नीने त्यांना फोनवरुन घटनेची पाहिती दिल्याने फारुख कादरी यांनी शहर पोलीस स्टेशन गाठत तक्रार दिली आहे.