महापालिकेच्या निर्णयामुळे पेट्रोल पंप मालकांमध्ये खळबळ

जळगाव – महानगरपालिकेने ज्या नागरिकांकडे दोन लसी घेण्याचे प्रमाणपत्र नसेल त्या नागरिकांना जळगाव शहरातील पेट्रोल पंपावर पेट्रोल मिळणार नाही असा आदेश पारित केल्याने पेट्रोल पंप मालकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. याबाबतची कोणतीही पूर्व सूचना किंबहुना कोणत्याही अध्यादेश अजून पर्यंत पेट्रोल पंप मालकानं पर्यंत पोहोचला नसल्याने पेट्रोल पंप मालक आता संभ्रमावस्थेत आहेत.

 

जळगाव महानगरपालिकेने आदेश पारित केल्या असल्याचे आम्हाला समजले आहे मात्र. त्याबाबतचे कोणतेही अधिकृत पत्र अजून पर्यंत जळगाव जिल्हा पेट्रोल डिझेल असोसिएशनला किंवा वैयक्तिक कोणत्याही पेट्रोल पंप मालकाला आलेले नाहीये. यामुळे आम्ही नक्की निर्णय तरी काय घ्यायचा याबाबत आम्ही शाशंक आहोत. अजून पर्यंत आयुक्तांनी किंवा उपायुक्तांनी आम्हाला कोणतेही पत्र दिलेले नाहीये. यामुळे अजून आम्ही वेट अँड वॉच च्या भूमिकेत आहेत

प्रकाश चौबे , पेट्रोल पंप मालक तथा अध्यक्ष जळगाव जिल्हा पेट्रोल डिझेल असोसिएशन

 

औरंगाबाद महानगरपालिकेने देखील असाच निर्णय घेतला होता. हा निर्णय त्याठिकाणी सपशेल फेल झाला आहे. पेट्रोल पंपावर वेळी-अवेळी विविध स्वभावाचे नागरिक पेट्रोल भरायला येत असतात. अशा वेळेस हे नागरिक पेट्रोल पंप वर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सहकार्य करतीलच असे नाही. महानगरपालिकेने हा निर्णय घेण्याआधी पेट्रोल पंप पालकांना विश्वासात घेणे आवश्यक होते मात्र आता उद्यापासून काय करायचे याबाबत आता आम्ही काहीच सांगू शकत नाही.

लक्ष्मीकांत चौधरी, पेट्रोल पंप मालक