आ. जगताप, आ. लांडगे यांची उपस्थिती
पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील महिलांना महापालिकेमार्फत चारचाकी हलके वाहन चालविण्याचे प्रशिक्षण देण्याचा शुभारंभ सोमवारी आमदार लक्ष्मण जगताप व आमदार महेश लांडगे यांच्या हस्ते संपन्न झाला. या प्रसंगी उपमहापौर शैलजा मोरे, स्थायी समिती अध्यक्षा ममता गायकवाड, सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, विधी समिती सभापती शारदा सोनवणे, महिला व बालकल्याण समिती सभापती सुनिता तापकीर, क्रीडा समिती सभापती लक्ष्मण सस्ते, शहर सुधारणा समिती सभापती सागर गवळी, क प्रभाग अध्यक्षा अश्विनी जाधव, माजी स्थायी समिती सभापती सिमा सावळे, नगरसेवक विलास मडिगेरी, शितल शिंदे, नामदेव ढाके, राहुल जाधव, हर्षल ढोरे, राजेंद्र लांडगे, कुंदन गायकवाड, विकास डोळस, नगरसदस्या आशा धायगुडे, निर्मला कुटे, सोनाली गव्हाणे, रेखा दर्शिले, आरती चोंधे, कमल घोलप, निकिता कदम, योगिता नागरगोजे, डॉ. वैशाली घोडेकर, चंदा लोखंडे, अतिरिक्त आयुक्त डॉ. प्रविण आष्टीकर, सहाय्यक आयुक्त स्मिता झगडे, अण्णा बोदडे, समाज विकास अधिकारी संभाजी ऐवले आदी उपस्थित होते.
पहिल्या टप्प्यात 1,744 महिलांना प्रशिक्षण
यावेळी एकनाथ पवार म्हणाले की, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका हद्दीतील महिला सक्षम बनल्या पाहिजेत. त्यांना स्वतःच्या पायावर उभे राहता यावे. यासाठी महापालिकेकडून महिलांच्या विकासासाठी व सक्षमीकरणासाठी विविध प्रकारच्या कल्याणकारी योजना राबविण्यात येतील. सुनिता तापकीर म्हणाल्या की, या महिला वाहन प्रशिक्षणासाठी मनपास एकूण 7,856 अर्ज प्राप्त झाले असून त्यातील 1,744 पात्र महिलांना पहिला टप्प्यात प्रशिक्षण देण्यात येणार आहे. दुसर्या टप्प्यात 1,600 पात्र महिलांना वाहन प्रशिक्षण देण्यात येणार आहे.