महापालिकेच्या विद्यार्थ्यांना मिळणार ‘रेडिओ’ संगीत शिक्षणाचे ‘धडे’

0

पिंपरी ः पिंपरी चिंचवड महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांना संगीत शिक्षणाचे धडे देण्यात येणार आहे. त्यात सर्व प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना हे मोफत रेडिओ पुणेरी आवाज 107.8 एफ.एम. कडून संगीत आणि प्रशिक्षण दिले जाणार आहे. महापालिकेच्या सुमारे 119 प्राथमिक शाळांमध्ये शिक्षण घेणारे विद्यार्थी सर्व सामान्य कुटूंबातील आहेत. त्या विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा, त्यांना संगीत शिक्षण दिल्यास शाळेची गोडी लागेल, शाळांचा दर्जा वाढेल. खासगी शाळांशी स्पर्धा होवून प्राथमिक शाळेची पटसंख्येत निश्‍चित वाढ होवून गुणवत्ता वाढण्यास मदत होईल. त्यामुळे महापालिका शिक्षण मंडळाने संगीत शिक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. सर्वसामान्य कुटूंबातील विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्यासाठी त्यांना शिक्षणासह संगीताची आवड निर्माण व्हावी, त्याकरिता पुणेरी आवाज 108.8 एफ.एम.कडून मोफत संगीत शिक्षण आणि प्रशिक्षण देण्यास शिक्षण मंडळाने मान्यता दिली आहे. शाळेच्या शेवटच्या वर्षात विद्यार्थ्यांची परीक्षा घेऊन त्यांना सरकारमान्य संस्थेचे प्रमाणपत्र देण्यात येणार आहे, अशी माहिती शिक्षण सभापती मनिषा पवार यांनी दिली.