-पालिकेने दिल्या जप्तीच्या अंतिम नोटिसा
पिंपरी-चिंचवड : महापालिकेच्या ग क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत विविध ठिकाणच्या भाजी मंडई व मासळी बाजारतील 27 भाडेकरुंकडे 87 लाख, 92 हजार, 586 रुपयांची थकबाकी आहे. येत्या 14 दिवसांत थकबाकीदारानी ही रक्कम न भरल्यास जप्तीची कारवाई केली जाणार आहे. यामध्ये एका खासगी इंग्रजी माध्यमाच्या शाळेचा समावेश आहे. या शाळेकडे सर्वाधिक 52 लाख, 96 हजार, 800 रुपये एवढी थकबाकी आहे. पिंपरीतील महापालिकेच्या मालकीची शाळा इमारत ही इंदिरा गांधी इंग्लिश मिडीयम हायस्कूलला भाडेतत्वार वापरण्यास दिली होती. या शाळेकडे सर्वाधिक 52 लाख, 96 हजार, 800 रुपये एवढी थकबाकी आहे.
14 दिवसांची मुदत
याशिवाय पिंपरीतील यशवंतराव चव्हाण व्यापार संकुलातील पाच थकबाकीदारांकडे 10 लाख 53 हजार, 776 रुपये, थेरगाव येथील मच्छि मार्केटमधील तीन गाळेधारकांकडे 45 हजार,866 रुपये, थेरगाव मटण मार्केटमधील पाच गाळेधारकांकडे 82 हजार, 706 रुपये तर थेरगाव भाजी मंडईतील एकून 13 गाळे धारकांकडे 23 लाख, 13 हजार, 438 रुपये अशी एकूण 87 लाख, 92 हजार, 586 रुपयांची थकबाकी आहे. या सर्व भाडेकरुंनी येत्या 14 दिवसांत थकबाकी भरण्याच्या नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. या मुदतीमध्ये थकबाकी जमा न केल्यास या भाडेकरुंचे काही म्हणणे नाही, असे समजून हे गाळे सील केले जाणार आहेत.