पिंपरी-चिंचवड : महापालिकेच्या वतीने कला साहित्य, सांस्कृतिक धोरणांतर्गत गुरुवारी (दि. 30) सायंकाळी 6 वाजता ऑटो क्लस्टर सभागृहात कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या कवी संमेलनामध्ये सुप्रसिद्ध हास्यकवी अशोक नायगांवकर यांच्यासह अनेक मान्यवर कवी सहभागी होणार असून, नागरिकांनी त्यासाठी उपस्थित रहावे, असे आवाहन महापालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
पालकमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन
महापौर नितीन काळजे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार्या या कवी संमेलनाचे उद्घाटन पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते होणार आहे.
या कार्यक्रमास खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, श्रीरंग बारणे, अमर साबळे, आमदार लक्ष्मण जगताप, गौतम चाबुकस्वार, महेश लांडगे, उपमहापौर शैलजा मोरे, सत्तारूढ पक्षनेता एकनाथ पवार, विरोधी पक्षनेता योगेश बहल, शिवसेना गटनेते राहुल कलाटे, मनसे गटनेते सचिन चिखले, अपक्ष गटनेते कैलास बारणे, आयुक्त दिनेश वाघमारे, अतिरिक्त आयुक्त तानाजी शिंदे, नगरसदस्या अनुराधा गोरखे, मंगला कदम, नगरसदस्य केशव घोळवे, तुषार हिंगे, सह शहर अभियंता प्रवीण तुपे, सह आयुक्त दिपीप गावडे उपस्थित राहणार आहेत.
या कवींचा सहभाग असणार
या कवी संमेलनात राज अहिरराव, सुरेश कंक, दीपेश सुराणा, अनिल दीक्षित, अॅड. गोरक्ष लोखंडे, अरूण बोर्हाडे, किशोर केदारी, नितीन यादव, पितांबर लोहार, धनाजी कांबळे, राजेंद्र घावटे, सुहास घुमरे, भालचंद्र मगदुम, भूषण नांदुरकर, सिद्धार्थ भोसले, तुकाराम पाटील, चंद्रकांत धस, नंदकुमार कांबळे, महेंद्र गायकवाड, संगीता झिंजुर्के, शोभा जोशी, सुनील भिसे, प्रदीप गांधलीकर, रमेश वाकनीस, वर्षा बालगोपाल, सविता इंगळे, नंद्कुमार मुरडे, माधुरी विधाते, धनंजय भिसे, दत्तू ठोकळे यांचा सहभाग असणार आहे.