महापालिकेतर्फे चर्‍होली शाळेला ई-लर्निंग साहित्य

0

महापौर नितीन काळजे यांच्या हस्ते

भोसरी : जानकीदेवी बजाज एज्युकेशनल इनिसिएटिव्ह या संस्थेतर्फे सीएसआरच्या माध्यमातून पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या चर्‍होली येथील पंडित जवाहरलाल नेहरू प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना ई-लर्निंग साहित्य उपलब्ध करून देण्यात आले. महापौर नितीन काळजे यांनी हे साहित्य प्राथमिक शाळेकडे सुपूर्द केले. या प्रसंगी महापालिका महिला व बाल कल्याण समिती अध्यक्षा सुनीता तापकीर, नगरसेविका सुवर्णा बुर्डे, विनया तापकीर, मुख्याध्यापक नामदेव उथळे, जानकीदेवी बजाज एज्युकेशनल इनिसिएटिव्ह संस्थेचे के. बी. वाळके, हेमांगी ठोनावाला, शाळा समन्वय समिती अध्यक्ष पांडूरंग पठारे, उपाध्यक्ष सुनील तापकीर आदी उपस्थित होते.

संगणक साक्षरता गरजेची
महापौर काळजे म्हणाले की, माहिती-तंत्रज्ञान आणि संगणकीकरणाच्या युगात विद्यार्थ्यांना संगणक साक्षरता गरजेची आहे. संगणक साक्षरतेबरोबरच संपूर्ण अद्ययावत माहिती, संगणकावरील सर्व क्रिया, कामकाज, अभ्यास याची ओळख होणे गरजेचे आहे. त्यासाठी ई-लर्निंग साहित्याची आवश्यकता आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना आपले ज्ञान वाढविण्यास मदत होईल.