पिंपरी ः पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस महापौर उषा ऊर्फ माई ढोरे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीत झालेल्या या कार्यक्रमास स्थायी समिती सभापती विलास मडिगेरी, नगरसदस्या अनुराधा गोरखे, अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील, मुख्य
लेखा परिक्षक आमोद कुंभोजकर, नगरसचिव उल्हास जगताप, जनसंपर्क अधिकारी रमेश भोसले आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माहिती व जनसंपर्क विभागाचे प्रफुल्ल पुराणिक यांनी केले.