महापालिकेतर्फे मिळकतधारकांना एफएम’ रेडिओवरुन मिळणार माहिती

0

पिंपरी-चिंचवड :- पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे सवलती, योजना तसेच वसुली जनजागृती मोहिमेची माहिती मिळकतधारकांना आता ‘एफएम’ रेडिओवरुन मिळणार आहे. पालिकेने २०१८-१९ या आर्थिक वर्षात आगाऊ मिळकत कराचा भरणा करणा-यांना विविध सवलती लागू केल्या आहेत. साउथ एशिया एफ.एम. लिमिटेड या कंपनीच्या रेड एफ.एम. (93.5 FM) व रिलायन्स ब्रॉडकास्ट कंपनीच्या बिग एफ.एम (92.7 FM) या खासगी आणि प्रसार भारती (101 FM) या शासकीय रेडिओ चॅनेलवरुन संपूर्ण जून महिन्यात कर सवलीतींची माहिती मिळकतधारकांना देण्यात येणार आहे. त्यासाठी नऊ लाख 34 हजार 560 रुपयांचा खर्च येणार आहे.

विविध सवलती देण्यात आल्या
शहरामध्ये चार लाख 83 हजार 463 मिळकती आहेत. या मिळकतींना महापालिकेतर्फे कर आकारणीसह मिळकतधारकांना विविध सवलती देण्यात आल्या आहेत. मिळकत कराचा भरणा होण्यासाठी दिलेल्या विविध सवलतींची माहिती मिळकतधारकांना होणे गरजेचे आहे. त्याकरिता शहरातील विविध रेडिओ स्टेशनवरुन जाहिरात प्रसिद्ध करणे आवश्यक आहे. शहरात साउथ एशिया एफ.एम. लिमिटेड या कंपनीचे रेड एफ.एम. (93.5 FM), रिलायन्स ब्रॉडकास्ट कंपनीचे बिग एफ.एम (92.7 FM), एंटरटेंटमेंट नेटवर्क (इंडिया) या कंपनीचे रेडिओ मिरची (98.3FM), रेडिओ सिटी (91.1 FM) हे खासगी रेडिओ चॅनेल्स आणि ऑल इंडिया रेडिओचे प्रसार भारती (101 FM) हे शासकीय रेडिओ चॅनेल आहे. रेडिओ चॅनेलवरुन जाहिरात प्रसिद्ध करण्याकरिता प्रत्येक कंपनीचे प्रति सेकंदाप्रमाणे वेगवेगळे दर ठरले आहेत.