मतदार पडताळणी कार्यक्रमात हलगर्जीपणा : तहसीलदारांचे आयुक्तांना पत्र
जळगाव – मतदार पडताळणी कार्यक्रमात हलगर्जीपणा करणार्या महापालिकेत कर्मचारी असलेल्या 21 बीएलओ अर्थात मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्यावर कारवाई करण्याची शिफारस तहसीलदारांनी महापालिका आयुक्तांकडे पत्राद्वारे केली आहे.
निवडणूक आयोगाच्या सुचनेनुसार दि. 1 जानेवारी 2020 या अर्हता दिनांकावर आधारीत घोषित केलेल्या छायाचित्रासह मतदार यादीचा विशेष संक्षिप्त कार्यक्रमाच्या अनुषंगाने मतदार पडताळणी कार्यक्रमाबाबत मतदान केंद्रस्तरीय अधिकार्यांना सुचना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार सर्व अधिकार्यांना हायब्रीड बीएलओ अॅप बाबत दि. 11 डिसेंबर रोजी प्रशिक्षण देण्यात आले होते. मात्र दोन महिन्यांचा कालावधी उलटूनही बीएलओ यांनी या विषयाची दखल घेतली नाही. ही बाब गंभीर असुन निवडणूक आयोगाचा अवमान करणारी आहे. त्यामुळे कामात टाळाटाळ आणि कसूर केल्याबाबत 21 बीएलओंवर लोकप्रतिनीधी अधिनियम 1950 चे कलम 32 नुसार गुन्हा दाखल का करण्यात येऊ नये? अशा आशयाची नोटीसही बजावण्यात आली होती. मात्र तरी देखिल या बीएलओंनी 50 टक्केपेक्षा कमी काम केल्याने त्यांच्यावर कारवाई करावी अशी शिफारस करणारे पत्र तहसीलदारांनी मनपा आयुक्तांना दिले आहे.
कारवाईची शिफारस असलेेले 21 बीएलओ
कैलास हरेश्वर चौधरी (48.47 टक्के काम), जयप्रकाश एन. कोल्हे (34.12), मो. जहिर अब्दुर कदिर (31.27), दिलिप गणपतराव घोडेस्वार (18.19), नारायण दत्तात्रय कापसे (16.03), नितीन पुनमचंद जैन (1.65), शेख रेहान भिकन (45.73), विवेक ज. संघई (39.68), खान अजहर ताहेर (35.52), शे. आसीफ शे. आयुब (38.41), शाह फहीम बाबाशाह (49.44), इकबाल अशार तडवी (36.91), कासार मो. अफसर मो. साबीर (36.34), मुजावर शाकीर अहमद (5.83), शकील रमजान तडवी (43.74), शेख अझरूद्दीन (40.49), मोमीन आमोनोद्दिन (48.95), सैय्यद अजीस सलीम ( 31.22), अकिल अहेमद गुलाम अहेमद (40.72), शेख अकिल इस्माईल (18.15), मो. अय्युब मुख्तार अहमद (34.75), शेख रिजवान अहमद मो. इस्माईल (29.73) या 21 कर्मचार्यांवर कारवाईची शिफारस करण्यात आली आहे.