पिंपरी : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने महात्मा गांधी पुण्यतिथी साजरी करण्यात आली. महापौर नितीन काळजे व स्थायी समिती अध्यक्षा सीमा सावळे यांनी महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला.
महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीत झालेल्या या कार्यक्रमास नगरसदस्या अनुराधा गोरखे, सह आयुक्त दिलीप गावडे, सहाय्यक आयुक्त आण्णा बोदडे, कामगार कल्यास अधिकारी विजय साबळे, प्रशासन अधिकारी रामकिसन लटपटे, माहिती व जनसंपर्कचे किशोर केदारी, रमेश भोसले आदी उपस्थित होते. महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्राणार्पण केलेल्या हुतात्म्यांच्या स्मरणार्थ आदर व्यक्त करण्यासाठी यावेळी 2 मिनीटे मौन पाळून त्यांना आदरांजली वाहण्यात आली.