महापालिकेत नागरी पथविक्रेता साहय्य समिती गठीत

0

जळगाव । राष्ट्रीय नागरी पथविक्रेता योजना 2017’च्या तरतुदीनुसार शहरातील नागरी पथविक्रेता साहाय्य’ समिती गठित करण्यात आली आहे. यानुसार आज समितीची बैठक प्रभारी अप्पर आयुक्त राजेश कानडे यांच्या अध्यक्षेताखाली झाली. बैठकीत समिती स्थापन करण्याचे उद्देश, बायोमेट्रिक पद्धतीने हॉकसेचे सर्व्हेक्षण तसेच हॉकर्स झोनबाबत माहिती देण्यात आली.

ही बैठक महापालिकेच्या दुसर्‍या मजल्यावर आयोजित करण्यात आली होती. याप्रसंगी साहय्यक उपायुकत डॉ. लक्ष्मीकांत कहार, शहर वाहतुक शाखेचे पोलिस निरीक्षक विलास सोनवणे, अतिक्रमण अधिक्षक एच. एम. खान उपस्थित होते. तसेच बैठकीस सर्व हॉकर्स संघटनेचे पदाधिकारी देखील उपस्थित होते. यावेळी कानडे यांनी समितीबाबतची माहिती दिली. तसेच हॉकर्सचे नव्याने बायोमेट्रिक पद्धतीने सर्वेक्षण हे 15 ते 23 नोव्हेंबरपर्यंत केले करून 30 नोव्हेंबरला यादी प्रसिध्द करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. याबाबत काही हरकती मागवून अंतिम यादी 30 डिसेंबरला प्रसिध्द करण्यात येणार आहे. तसेच सर्वेक्षणानंतर यादीमधील हॉकर्सला ओळखपत्र, विक्री प्रमाणपत्र दिले जाणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.