पिंपरी- पिंपरी-चिंचवड महापालिकेत भाजपची सत्ता आल्यापासून सभागृहात विरोधकांची मुस्कटदाबी होत असून आवाज दाबत असल्याचा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेसने सभागृहात स्पीकर वापरण्याची परवानगी आयुक्तांकडे मागितली आहे. तसेच खासगी स्पीकर खरेदी केले आहेत. विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी हा स्पीकर आणला आहे.
सभागृहात वापरण्याची परवानगी देण्यासाठी त्यांनी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदन दिले आहे. महापालिकेत भाजपची सत्ता आल्यापासून सभागृहात विरोधी पक्षाच्या नगरसेवकांना एखाद्या विषयावर आपले मत मांडत असताना त्यांच्या समोरील माईक जाणूनबुजून बंद केला जातो. आवाज कमी करणे असे प्रकार सातत्याने होता आहेत. त्यामुळे विरोधी पक्षाच्या नगरसेवकांना आपले मत मांडता येत नाहीत. विरोधकांची मुस्कटदाबी भाजपकडून केली जात आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी सभागृहात स्पीकर वापरण्याचा निर्णय घेतला आहे. सभागृहात स्पीकर वापरण्याची परवानगी देण्यात यावी.