निगडीतील जय बजरंग मित्र मंडळाला प्रथम क्रमांक
51 हजार रुपयांचे रोख रक्कमेचे बक्षीस
पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेने गणेशोत्सवादरम्यान घेतलेल्या गणेशोत्सव सजावट स्पर्धेत निगडी येथील जय बजरंग मित्र मंडळाने धार्मिक गटात (काली मातेचा महिमा), रूपीनगर-तळवडे येथील दक्षता तरुण मंडळाने जिवंत देखावा गटात (हेची दान देगा मानवा, अवयव दान) आणि नेहरूनगर येथील राष्ट्रतेज मित्र मंडळाने (मोबाईल शाप कि वरदान) प्रथम क्रमांक पटकावला आहे. या तीनही मंडळांना प्रत्येकी 51 हजार रुपयांचे प्रथम क्रमांकाचे रोख रक्कमेचे बक्षीस महापालिकेच्या वतीने दिले जाणार आहे. या स्पर्धेत शहरातील एकूण 65 गणेश मंडळांनी सहभाग घेतला होता. त्यातील 38 मंडळे बक्षीसपात्र ठरली आहेत. या मंडळांना एकूण 5 लाख 50 हजार रुपयांची बक्षिसे जाहीर झाली आहेत. जेष्ठ पत्रकार नंदकुमार सातुर्डेकर, कलाशिक्षक श्रावण जाधव व पुरुषोत्तम शेलार यांनी गणेशोत्सव स्पर्धेचे परीक्षक म्हणून काम पाहिले. या तिघांनी महापौर नितीन काळजे यांच्याकडे स्पर्धेचा निकाल सुपूर्द केला. यावेळी स्थायी समिती सभापती ममता गायकवाड, सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे आदी उपस्थित होते.
गणेशोत्सव स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे-
धार्मिक देखावा – प्रथम क्रमांक जय बजरंग मित्र मंडळ, निगडी(काली मातेचा महिमा), द्वितीय क्रमांक पठारे लांडगे तालीम व्यायाम मंडळ, भोसरी (श्रीकृष्णाचा जन्म), तृतीय क्रमांक-भारत माता तरुण मंडळ-खराळवाडी (संकट मोचन हनुमान), चतुर्थ क्रमांक विभागून उत्कृष्ट तरुण मंडळ, चिंचवड (जागरण गोंधळ) व श्रीराम मित्र मंडळ, भोसरी (कथा दत्त जन्माची), पाचवा क्रमांक विभागून डी वार्ड फ्रेंड सर्कल (भक्ती महल) व छत्रपती श्री शिवाजी तरुण मंडळ, पिंपळेगुरव (संत तुकाराम महाराजांचा भक्तीचा मळा). उत्तेजनार्थ – नव महाराष्ट्र तरुण मंडळ-भोसरी, हनुमान मित्र मंडळ-चिंचवड स्टेशन, शिवाजी उदय मंडळ-चिंचवड, कै. दामुशेठ गव्हाणे मित्र मंडळ-भोसरी, विशेष उत्तेजनार्थ-जय बजरंग मित्र मंडळ-आहेरवाडी चिखली, श्री दत्त तरुण मंडळ- दत्तवाडी आकुर्डी.
जिवंत देखावा – प्रथम क्रमांक दक्षता तरुण मंडळ, रुपीनगर (हेची दान देगा मानवा, अवयव दान), द्वितीय क्रमांक राष्ट्रतेज तरुण मंडळ, काळभोरनगर (लोकहो तुम्हाला सिस्टीमवर भरोसा नाय का), तृतीय क्रमांक श्री नागेश्वर मित्र मंडळ, आकुर्डी (लाल महालातील शिव तांडव), चतुर्थ क्रमांक विभागून एस.के.एफ. इंडिया लिमिटेड गणेशोत्सव मित्र मंडळ, चिंचवड (स्त्री शक्ती ही राष्ट्रशक्ती) व सिंधूनगर युवक मित्र मंडळ, प्राधिकरण (घडलंय बिघडलंय), पाचवा क्रमांक विभागून गांधीपेठ तालीम मित्र मंडळ, चिंचवड (कर्तव्यदक्ष श्रेष्ठ सैनिक) व श्री हनुमान व्यायाम मंडळ, चिखली (गाव अपशिंगे). उत्तेजनार्थ – वीर अभिमन्यू फ्रेंड सर्कल साने चौक-चिखली, शिव शक्ती मित्र मंडळ-आकुर्डी, जाणता राजा ग्रुप-कासारवाडी, त्रिमूर्ती मित्र मंडळ-चिंचवड, विशेष उत्तेजनार्थ- सम्राट मित्र मंडळ-थेरगाव, अमरदीप मित्र मंडळ-पिंपरीगाव.
समाजप्रबोधनपर देखावे- प्रथम क्रमांक राष्ट्रतेज मित्र मंडळ, नेहरूनगर (मोबाईल शाप कि वरदान), द्वितीय क्रमांक श्रीकृष्ण क्रांती मित्र मंडळ, आकुर्डी (आमच्यावर भरोसा नाय काय), तृतीय क्रमांक हनुमान तरुण मंडळ, चिंचवड (धरा नियमांची कास करा सुरक्षित प्रवास), चतुर्थ क्रमांक विभागुन संत सावतामाळी तरुण मंडळ, चिखली (मातृपितृ सेवा हिच ईश्वरसेवा) व लांडगे लिंबाची तालीम मंडळ, भोसरी(शिवशाहीचा हाच शिरस्ता), पाचवा विभागून श्री लक्ष्मीनगर सार्वजनिक मित्र मंडळ, चिंचवड (व्यथा भारतमातेची, अंधश्रधा पर्यावरण) व सिद्धिविनायक प्रतिष्ठान (आरोग्यम धनसंपदा). उत्तेजनार्थ – जिव्हाळा सामाजिक संस्था हिंदवी स्वराज युवा मंच-आहेरवाडी, श्री शिव छत्रपती मित्र मंडळ-जाधववाडी, स्वराज्य प्रतिष्ठान-पिंपरीगाव, संतनगर मित्र मंडळ-मोशी प्राधिकरण, नवयुग मित्र मंडळ-रुपीनगर.