भुसावळातील मुस्लीम कॉलनीत चोरी : आरोपी जाळ्यात
जळगाव गुन्हे शाखेची कारवाई : सोन्याच्या पेंडलसह रोख रक्कम जप्त
भुसावळ : शहरातील मुस्लीम कॉलनीत लॉकडाऊन दरम्यान बंद घरातून चोरट्यांनी दोन हजार 500 रुपयांच्या रोकडसह तीन ग्रॅमचे सोन्याचे पेंडल चोरीला गेले होते. या प्रकरणी जळगाव गुन्हे शाखेने गुन्ह्याची उकल केली असून शेख जहीर शेख सलीम (रा.मुस्लिम कॉलनी, भुसावळ) यास अटक करण्यात आली आहे. आरोपीच्या ताब्यातून सोन्याचे पेंडल व मणी जपत करण्यात आले.
यांनी आवळल्या आरोपीच्या मुसक्या
ही कारवाई जळगाव गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किरणकुमार बकाले यांच्या मार्गदर्शनाखाली एएसआय अशोक महाजन, सहाय्यक फौजदार शरीफ काझी, युनूस शेख, किशोर राठोड, विनोद पाटील, रणजीत जाधव, अशोक पाटील, मुरलीधर बारी आदींनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या.