दळवीनगरचा दुचाकीस्वार गंभीर जखमी
पिंपरी-चिंचवड : महापालिकेसमोर उभ्या असलेल्या एका कारला भरधाव येणार्या दुचाकीने पाठीमागून जोरदार धडक दिली. ही घटना बुधवारी दुपारी अकराच्या सुमारास घडली. यामध्ये दुचाकीस्वार शब्बीर इकबाल शेख (वय 29, रा. दळवीनगर, चिंचवड) जखमी झाला आहे. शेख हा भरधाव वेगाने पुण्याच्या दिशेने जात होता. यावेळीसमोर जाणार्या पीएमपीएमएल बसला ओव्हरटेक करत असतानाना हा अपघात झाला. त्याच्या डोक्याला व चेहर्याला गंभीर जखम झाली आहे. त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
रस्त्यावरील वाहन पार्किंगचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर
महापालिकेसमोर रस्त्यावर बेकायदेशीरपणे उभ्या केल्या जाणार्या वाहनांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. त्याचाच फटका आज या तरुणाला बसला. एखाद्याचा जिव गेल्यानंतरच पालिका प्रशासन आणि पोलीस प्रशासनाला जाग येणार का असा प्रश्न उपस्थित नागरिकांनी केला. याविषयी पिंपरी-चिंचवड वाहतूक शाखेचे सहायक पोलीस आयुक्त राजेंद्र भांबरे यांना विचारले असता त्यांनी बोलणे टाळत आपणास याची काहीच कल्पना नसल्याचे सांगत स्थानिक अधिकार्यांशी बोलण्यास सांगून हात झटकले. तर पिंपरी येथील वाहतूक पोलीस निरीक्षक रवींद्र निंबाळकर म्हणाले, हा रस्ता नो पार्किंग झोन करावा यासाठी प्रयत्नशील आहोत. यासाठी आम्ही वरिष्ठांकडेही तशी मागणी केली आहे. अद्याप त्याला मंजुरी मिळालेली नाही. मंजुरी मिळताच आम्ही संबंधित ठिकाणी कारवाई करु.