महापुरामुळे 22 ठार

0

गुवाहाटी : आसाममध्ये संततधार पावसामुळे पुराने थैमान घातले असून, पावसाने अनेक जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. ब्रम्हपुत्रा नदीने धोक्याची पातळी ओलांडल्याने प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. आसाममधील नद्यांना आलेल्या पुरामुळे आतापर्यंत 22 जणांना आपला जीव गमवावा लागला. काही नद्या धोक्याची पातळी ओलांडण्याच्या स्थितीत आहेत.

पुरामुळे 15 जिल्ह्यांतील अनेक गावे पाण्याखाली गेली आहेत. प्रशासनाचे युध्दपातळीवर बचाव कार्य सुरु केले होते. लखीमपुर, गोलाघाट, जोरहट, काचर, धीमाजी, बिस्वनाथ, करीमगंज, शोणितपुर, दरांग, होजई, मजुली, बारपेटा व नागौन जिल्ह्यातील 740 हून अधिक गावांतील लोकांना पुराचा सामना करावा लागत आहे. येथील लोकांना सुरक्षित स्थळी नेण्यात आले आहे. तसेच राज्यातील 14,884 हेक्टर शेतीचे नुकसान झाले आहे.