भुसावळ। लोकमान्य टिळकांनी आपल्या लेखनीच्या माध्यमातून इंग्रजांविरुध्द लढा उभारला. तसेच सर्व सामान्यांमध्ये देशभक्ती निर्माण केली तर अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या पोवाड्यांच्या माध्यमातून जनजागृतीचे कार्य केले आहे. या दोन्ही महापुरुषांच्या कार्याची आठवण करुन त्यांचे अनुकरण करण्याचे आवश्यकता असल्याचे प्रतिपादन डॉ. शुभांगी राठी यांनी केले.
महापुरुषांच्या जीवनकार्यावर प्रकाशझोत
येथील प.क. कोटेचा महिला महाविद्यालयात लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी व अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. प्रमुख वक्त्या डॉ. शुभांगी राठी यानी लोकमान्य टिळक व अण्णाभाऊ साठे यांच्या जीवन कार्यावर प्रकाशझोत टाकला व लोकमान्य टिळक यांनी परखडपणे अन्यायाच्या विरुध्द लढा देवून भारतीयांमध्ये स्वातंत्र्याची ज्योत पेटविण्याचे महान कार्य केले.
कार्यक्रमास यांची होती उपस्थिती
अध्यक्षीय मार्गदर्शनातून उपप्राचार्य व्ही.एस. पाटील यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या जीवन शैलीवर व लोकमान्य टिळकांचे निवासस्थानाला दिलेल्या भेटीची आठवण नमूद केली. मान्यवरांनी प्रतिमेला माल्यार्पण करुन कार्यक्रमाची सुरुवात केली. उपस्थितांचे स्वागत समारंभ समितीचे चेअरमन डॉ.नारखेडे व डॉ. एस.के. अग्रवाल यांनी केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा. डी.एम. ललवानी यांनी तर आभार प्रा. दिपाली पाटील यांनी मानले. कार्यक्रमास बहुसंख्य विद्यार्थीनी उपस्थित होत्या. कार्यक्रम यशस्वीतेसाठी समिती सदस्य व शिक्षकेतर कर्मचार्यांनी परिश्रम घेतले.