महापुरुषांच्या पुतळ्याची रंगरंगोटीची मागणी

0

नंदुरबार । येथील माळीवाडा परिसरातील महापुरुषांच्या पुतळ्यांची व परिसराची स्वच्छता व रंगरंगोटी करण्यात यावी, अशी मागणी अखिल भारतीय माळी महासंघ नंदुरबार जिल्हा शाखेतर्फे नगरपालिका मुख्याधिकार्‍यांकडे करण्यात आली आहे. निवेदनात म्हटल्याप्रमाणे, 3 जानेवारी रोजी वंदनीय क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी केली जाणार आहे. त्यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी माळी परिसरातील त्यांच्या पुतळ्याजवळ हजारो नागरीक, राजकीय व सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या संस्था, संघटना, पुरोगामी विचारांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने एकत्र येत असतात. या दिनाचे महत्त्व लक्षात घेवून म.ज्योतिबा फुले व सावित्रबाई फुले यांच्या पुतळ्याची रंगरंगोटी व्हावी, चौथर्‍याचे सुशोभिकरण व्हावे, तसेच माळीवाडा परिसराची संपूर्ण स्वच्छता करण्यात यावी.

कामे पुर्ण करण्याचे आवाहन
1 ते 7 जानेवारी दरम्यान सन्मान सप्ताह सुरु होत असून त्यापूर्वीच सदर कामे करण्यात यावीत, अशी मागणी करण्यात आली आहे. मुख्याधिकार्‍यांना निवेदन देतेवेळी महासंघाचे जिल्हाध्यक्ष मनोज मोहन गायकवाड, जिल्हा उपाध्यक्ष योगेश माळी, तालुकाध्यक्ष पोपट महाजन, धमराज माळी, नरेंद्र जाधव, अविनाश राजेंद्र माळी आदी उपस्थित होते.