महापुरुषांच्या विचारांची पारायणे होण्याची आवश्यकता

0

बोदवड । गोखले, आगरकरांचे कार्य सुधारणावादी होते. त्यांचे कार्य फक्त उच्चवर्णीयांपर्यंत पोहचले. मात्र राजर्षी शाहू महाराजांनी सर्व क्षेत्रात उमटविला होता. याचा समावेश बाबासाहेबांनी राज्य घटनेत समावेश करुन फुले, शाहूंच्या कार्याचा वारसा डॉ. आंबेडकरांनी पुढे चालविला. शाहू महाराजांनी जनतेसाठी समर्पित जीवन जगले म्हणून भागवताच्या पारायणापेक्षा फुले, शाहू, शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचे पारायणाचे कार्यक्रम केले पाहिजे, असे प्रतिपादन डॉ. उध्दव पाटील यांनी केले.

कार्यक्रमास यांची होती उपस्थिती
कार्यक्रमाचे उद्घाटक नगराध्यक्षा मुमताजबी सईद बावागन होत्या. प्रमुख अतिथी तहसिलदार भाऊसाहेब थोरात, पोलीस निरीक्षक अनिरुध्द अढाव, एस.एस. पाटील, संजय काकडे, जिल्हा कार्याध्यक्ष संभाजी बिग्रेड, आत्मसन्मान फाऊंडेशनचे विजय पाटील, समाधान सुशीर, सलीम कुरेशी, रफिक कुरेशी, विजय पालवे आदी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी व्ही.बी. सोनवणे, प्रा. प्रभाकर महाले, प्रा. आय.आर. तडवी, व्ही.एन. दांडगे, संजय राणे, रविंद्र गवळी, दिलीप गवळी, एस.टी. पावरा, संतोष निकम, जनार्दन गायकवाड आदींनी केले.

जनजागृती उपक्रम
राजर्षी शाहू महाराजांची जयंती जनहित फाऊंडेशनचे तिसरे वर्ष असून या माध्यमात, मतदान जागृती, आरक्षण जागृती व शिक्षण जागृती सारखे दरवर्षी उपक्रम राबविले जात आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जनहित अभियान फाऊंडेशनचे संयोजक बी.डी. इंगळे यांनी केले. सुत्रसंचालन पुरुषोत्तम गड्डम यांनी तर आभार संतोष निकम यांनी मानले.