नवी दिल्ली: संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आज शुक्रवार ३१ जानेवारीपासून सुरुवात होत आहे. आज आर्थिक पाहणी अहवाल सादर होणार आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अभिभाषणाने अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. राष्ट्रपतींनी आपल्या अभिभाषणात सरकारतर्फे केल्या जाणाऱ्या कामांची माहिती दिली. मागील पाच वर्षात सरकारने केलेल्या कामामुळे भारताचे जगभरात नाव झाले आहे. महापुरुषांनी पाहिलेल्या नवभारतचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचे राष्ट्रपतींनी अभिभाषणात सांगितले. महात्मा गांधी, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, पंडित जवाहरला नेहरू, सरदार पटेल, श्याम प्रसाद मुखर्जी यांना अभिप्रेत असलेल्या भारताची निर्मिती करण्यासाठी हे सरकार प्रयत्नशील आहे, या कार्यात देशातील नागरिकांनीही सरकारला साथ द्यावी असे आवाहनही राष्ट्रपतींनी केले. ‘सबका साथ, सबका विश्वास, सबका विश्वास’ या मूलमंत्रावर सरकार काम करत आहे असे सांगून राष्ट्रपतींनी भेदभाव विरहीत सरकार काम करत असल्याचा विश्वास व्यक्त केला.
३७० रद्द करून सरकारने संपूर्ण देशाच्या नागरिकाला असलेले अधिकार जम्मू-काश्मीर, लद्दाखच्या नागरिकांना दिले आहे.