महाराष्ट्र माळी समाज महासंघातर्फे भडगाव पोलीसांना निवेदन
भडगाव – शिक्षणाचे आद्यक्रांतिकार राष्ट्रपिता क्रातीसुर्य महात्मा जोतिबा फुले तसेच राजमाता जिजाऊ, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, हिंदू संस्कृती बद्दल नेहमी सोशल मीडियावर आक्षेपार्थ व बदनामीकारक पोस्ट टाकणारा कपिल सरोदे याच्यावर तात्काळ कारवाई करून अटक करण्यात यावी, असे निवेदन महाराष्ट्र माळी समाज महासंघ यांच्यातर्फे भडगाव पोलिस उपनिरीक्षक आनंद पठारे, तहसिलदार सी.एम. वाघ यांना देण्यात आले.
कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा
शिक्षणाचे खरे क्रांतिकारक महात्मा फुले, राजमाता जिजाऊ, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, हिंदू संस्कृतीबद्दल कपिल सरोदे या व्यक्तीने आक्षेपार्ह पोस्ट टाकून त्यांची बदनामी करून त्यांचा एकेरी भाषेत लल्लेख करत सामाजिक एकता खराब करणार्या तसेच महात्मा फुले यांच्या अनुयायी मने दुखावण्याचा काम या व्यक्तीकडून सातत्याने होत असून सोशल मीडियाचा दुरुपयोग होत आहे. भविष्यात जातीय तेढ निर्माण करत आहे. तरी निवेदनाद्वारे आपणास महाराष्ट्र माळी समाज महासंघ पदाधिकारी विनंती करतो की, अश्या समाज कटक विरूद्ध आपण सोशल मीडिया क्राइम अंतर्गत संबंधितावर प्रतिबंध कार्यवाही करावी, अन्यथा महाराष्ट्र माळी समाज महासंघ राज्यभर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा निवेदनाद्वारे केला आहे.
निवेदनावर यांच्या आहेत स्वाक्षर्या
या निवेदनावर महाराष्ट्र माळी समाज महासंघाचे नाशिक विभागीय उपाध्यक्ष सागर महाजन, युवक जिल्हाध्यक्ष देवराम महाजन, व्यापारी जिल्हाध्यक्ष नितीन महाजन, भडगाव तालुकाध्यक्ष राहुल महाजन, शहराध्यक्ष विकास महाजन, युवक तालुकाध्यक्ष चेतन महाजन, सरचिटणीस सोनू महाजन, संघटक राहुल महाजन, शुभम महाजन आदी पदाधिकारी उपस्थित होते.