महापुरूषांना डोक्यावर घेण्यापेक्षा डोक्यात घ्या

0

शहादा । महापुरुषांना डोक्यावर घेण्यापेक्षा डोक्यात घेणे आवश्यक असे प्रतिपादन शिव व्याख्याते संजीव सोनवणे यांनी आपल्या प्रवचनातुन केले. ते शिवनेरी कॉलनीत गणेशोत्सवानिमित्त आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमात बोलत होते. महापुरुषांचे विचार प्रत्यक्ष जिवनात आचरणात आणणे हीच खरी त्या महापुरुषांना दिलेली एक बहुमोल भेट असेन असे सांगितले. शिवाजी महाराज लहान असताना नेहमी संत तुकाराम महाराज यांचा किर्तनाला व प्रवचनाला जात असत. यावेळी संत तुकारामांनी महाराजांना छत्रपती संबोधले होते असे त्यांनी स्पष्ट करत शिवाजी महाराजांनी निर्माण केलेला आदर्श समोर ठेवण्याचे आवाहन केले.

मुलांना मोबाईलपेक्षा संगणक की बोर्ड द्या
शिवाजी सोनवणे यांनी महात्मा ज्योतीबा फुले यांनी स्वतःच् पत्नीला शिकविले व 1 जानेवारी 1948 ला पहिली शाळा काढली. तर 1951 ला दुसरी असे करत संपूर्ण महाराष्ट्रभर 24 शाळा सुरु झाल्या. अण्णाभाऊ साठे यांनी शिवाजी महाराजांना विदेशात पोहचविण्याचे काम पोवाड्या मार्फत केले. त्यांनी केलेल्या रचनेवर आधारीत आजचा निर्मात्यानी फकीरा , सुलतान चित्रपट काढुन कोट्यावधी रुपये कमविले तर स्वतः अण्णाभाउ साठे उपेक्षीत राहिल्याची खंत त्यानी यावेळी व्यक्त केली. डॉ बाबासाहेब आंबेडकर यानी बनविलेल्या संविधानात 340 ,341 , 342 कलम ज्यात ओबीसी , एस सी , एस. टी. विषयी चर्चा केली आहे. त्याचा अभ्यास करायला कोणाला वेळच नाही. विचारांचे आदान प्रदान व्हायला पाहिजे, वाचन केले पाहिजे. मुलांना मोबाईलपेक्षा संगणक की बोर्ड दिला पाहिजे. देशप्रेम व देशभक्ती जागृत व्हावी असे संस्कार मुलांवर झाले पाहिजेत अशी अपेक्षा व्यक्त केली. आजची पिढी ही टॅलेंट अपडेट पिढी असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. मोरे यानी केले.