महापौरपदासाठी भाजपच्या भारती सोनवणेंचा अर्ज दाखल

0

शिवसेनेसह एमआयएमचा पाठिंबा; 27 रोजी होणार शिक्कामोर्तब

जळगाव: राज्यात भाजप आणि शिवसेना विरोधक असले तरी जळगाव महानगरपालिकेत भाजपच्या महापौरपदाच्या उमेदवाराला शिवसेने पाठिंबा दिला. दरम्यान, महापौरपदासाठी भारती सोनवणे यांना आपला उमेदवारी अर्ज नगरसचिव सुनील गोराणे यांच्याकडे दाखल केला आहे. मनपातील सर्व पक्षाने पाठिंबा दिल्यामुळे सोनवणे यांची महापौरपदी बिनविरोध निवड होण्याची शक्यता निश्‍चित झाली आहे. महापौर निवडीची अधिकृत दि.27 रोजी होणार आहे.

मनपाच्या 2018 मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजपची एकहाती सत्ता आली.त्यानंतर पक्षाच्या ध्येय धोरणानुसार प्रत्येकांना महापौरपदाची सव्वा-सव्वा वर्षाची संधी देण्याबाबतचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार सीमा भोळे यांना महापौरपदाची संधी दिली गेली. भोळे यांनी राजीनामा दिल्यानंतर पुढील महापौरपदासाठी भारती सोनवणे यांचे नाव निश्‍चित केले.त्यानुसार भारती सोनवणे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यावेळी शिवसेनेसह एमआयएमने देखील पाठिंबा दिला आहे. यावेळी उपमहापौर डॉ.अश्‍विन सोनवणे,माजी महापौर सीमा भोळे,स्थायी समिती सभापती अ‍ॅड.शुचिता हाडा,महिला बालकल्याण सभापती शोभा बारी,गटनेते भगत बालाणी,उपगटनेते राजेंद्र घुगे-पाटील,कैलास सोनवणे,भाजपचे महानगराध्यक्ष दीपक सुर्यवंशी,सुनील खडके,विशाल त्रिपाटी,धिरज सोनवणे, यांच्यासह शिवसेनेचे विरोधीपक्ष नेते सुनिल महाजन, नितिन लढ्ढा,विष्णू भंगाळे,प्रशांत नाईक तर एमआयएमकडून रीयाज बागवान उपस्थित होते.

मनपाच्या 2018 मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजपला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. तसेच शिवसेना उपनेते तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील व भाजप नेते माजी पालकमंत्री गिरीष महाजन यांच्यात झालेल्या चर्चेनुसार शहराच्या विकासाठी समन्वय राहवा म्हणून महापौर बिनविरोध करण्याचा निर्णय झाल्याची माहिती शिवसेनेचे विरोधी पक्ष नेते सुनिल महाजन यांनी दिली.

माजी मंत्री आ.गिरीष महाजन व पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या सुचनेनुसार शहराच्या विकासासाठी महापौर पदाच्या निवडणुकीत भाजप व शिवसेना ही नैसर्गिक युती झाल्याची माहिती भाजपाचे मनपा गटनेते भगत बालाणी यांनी सांगितले.