महापौरपदासाठी भारती सोनवणे यांचे नाव निश्‍चित; आज अर्ज दाखल करणार

0

जळगाव : महापौरपदाच्या निवडीचा कार्यक्रम जाहीर झाला असून अर्ज दाखल करण्याची दि.24 पर्यंत मुदत आहे. दरम्यान,महापौरपदासाठी पक्षासाठी भाजप गटनेते भगत बालाणी यांनी चार तर उपगटनेते राजेंद्र घुगे-पाटील यांनी चार असे आठ अर्ज नेले आहे. दरम्यान,महापौरपदासाठी इच्छूकांची पक्षक्षेष्ठींकडे मोर्चे बांधणी सुरु असली तरी भारती सोनवणे यांचे नाव निश्‍चित झाले आहे. त्यामुळे उद्या दि. 23 रोजी महापौरपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.

भाजप पक्षाच्या ध्येय धोरणानुसार वर्षभराच्या कालावधीनंतर सीमा भोळे यांनी महापौरपदाचा राजीनामा दिला आहे.त्यामुळे महापौरपदाच्या निवडीसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. दि.24 पर्यंत अर्ज दाखल करण्याची मुदत असून दि.27 रोजी पीठासन अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे यांच्या उपस्थितीत महापौर निवडीची सभा होणार आहे. दरम्यान,बुधवारी भाजपचे भाजप गटनेते भगत बालाणी यांनी चार तर उपगटनेते राजेंद्र घुगे-पाटील यांनी चार असे आठ अर्ज नगरसचिव सुनील गोराणे यांच्याकडून नेले आहे. यावेळी नगरसेवक विशाल त्रिपाटी उपस्थित होते. महापौर पदासाठी इच्छूकांची मोर्चेबांधणी सुरू असली तरी पक्षश्रेष्ठींने महापालिकेवर भाजपची सत्ता आल्यानंतर सोनवणे यांना महापौर पदासाठी आश्‍वासन दिले होते. त्यामुळे त्यांचे नाव निश्‍चित झाले आहे.

डॉ.अश्‍विन सोनवणे देणार उपमहापौरपदाचा राजीनामा

उपमहापौर डॉ.अश्‍विन सोनवणे यांचा गुरुवारी वाढदिवस आहे. वाढदिवसानंतर ते उपमहापौरपदाचा राजीनामा देणार असल्याची चर्चा आहे.त्यामुळे महापौरनिवडीनंतर उपमहापौरपदाची निवड देखील होणार आहे.