महापौरपदी भारती सोनवणे बिनविरोध निश्तिच

0

प्रभाग क्र.19 अ मधील पोटनिवडणुकीत शिवसेनेच्या निता कोळी बिनविरोध

जळगाव : महापौरपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शुक्रवारी शेवटचा दिवस होता. महापौरपदासाठी भाजपच्या भारती सोनवणे यांचा एकमेव उमेदवारी अर्ज असल्यामुळे त्यांची महापौरपदी बिनविरोध निवड निश्चित झाली असून दि.27 रोजी होणार्‍या सभेत शिक्कामोर्तब होणार आहे.तसेच प्रभाग क्र.19 अ मधील पोटनिवडणुकीत शिवसेनेच्या निता कोळी आणि अपक्ष उमेदवार आशा कोळी यांचे अर्ज दाखल झाले होते.मात्र आशा कोळी यांनी माघार घेतल्यामुळे निता कोळी यांची नगरसेवक म्हणून बिनविरोध निवड निश्‍चित झाली आहे.

महापौर निवडीची सोमवारी घोषणा

महापौर पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी शुक्रवारी शेवटचा दिवस होता. मुदतीपर्यंत भारती सोनवणे यांच्या व्यतीरिक्त कुणीही अर्ज न भरल्याने सोनवणे यांची महापौरपदी बिनविरोध निवड निश्चित झाली आहे. सोमवारी दि. 27 रोजी प्रक्रीया पूर्ण करुन पिठासीन अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे महापौर निवडीची औपचारीक
घोषणा करतील.