महापौरांची विद्युत विभागाच्या गोडाऊनला नगरसेवकांसह अचानक भेट

0

जळगाव । महापौर ललित कोल्हे यांनी गणपती नगरातील विद्युंत विभागाच्या गोडाऊनची अचानक पहाणी मंगळवार 12 सप्टेंबर रोजी केली. या पहाणीत त्यांना अनियमितता आढळून आली. यावेळी त्यांच्यासोबत नगरसेवक सुनील महाजन, अनंत जोशी, पृथ्वीराज सोनवणे हे देखील उपस्थित होती. या पहाणीत गोडाऊनमध्ये असलेले विद्युत सामानाची तपासणी केली. तसेच गोडाऊनमध्ये असलेले खरेदी रजिस्टर व लेआऊट विकासाकडून घेतलेले विद्युंत साहित्याची नोंद असलेले रजिस्टरांची तपासणी केली. यात खरेदी रजिस्टर हे 2013 पासूनचे उपलब्ध असल्याचे आढळून आले. तर विकासकांकडून घेतलेले काही विद्युत साहित्य पडून असल्याचे पहाणीत आढळले.

साहित्य तसेच पडून
विकासांकडून घेण्यात आलेले लाईट विद्युत विभागाकडे पडून असून शहरात लाईट नसल्याने काही भागांत अंधार आहे. तेथे विकासाकडून घेण्यात आलेले साहित्य वापरात आले असते. विकासाकांकडून पाच ते सहा वर्षांपासून विद्युत साहित्य घेण्यात आलेले आहे. हे साहित्य वापरात न आणल्याने गोडाऊनमध्ये पडून खराब झाले आहे. यापेक्षा हे साहित्य शहरात वापारावे अशा सूचना महापौर ललित कोल्हे यांनी दिल्या आहेत.

सर्व प्रभागात दुरूस्ती करा
महापौर ललित कोल्हे यांनी विद्युत अभियंता एस. एस. पाटील यांना विविध सूचना दिल्यात. यात त्यांनी शहरातील सर्व 37 प्रभागांत सकाळ-संध्याकाळ विद्युत विभागाची गाडी पाठवून खराब झालेले लाईट व दुरूस्तीचे काम करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच हे काम 20 दिवसांत पूर्ण करण्याच्या सूचना करण्यात आल्या. विकासांतर्फे जमा करण्यात येणार्‍या विद्युत साहित्यांची योग्य देखभाल करण्याबाबत त्यांनी सूचना केल्या.

प्रत्येक युनीटला देणार भेट
शहरातील सर्व 4 विद्युत युनीटीची पहाणी करण्यात येणार आहे. यात विद्युत साहित्याचे योग्य प्रकारे वापर होत आहे किंवा नाही याची तपासणी करण्यात येणार आहे. महापौर कोल्हे यांनी विद्युत विभागाच्या गणपती नगरातील युनीट गोडाऊनमधील नोंदी तपासल्या. लेआऊट विकासाकडून घेतलेल्या सामानाची योग्य प्रकारे वापर करण्याचा सूचना देखील महापौर कोल्हे यांनी दिल्यात.तसेच प्रत्येक प्रभागात 20 दिवसात काम पुर्ण करण्याची सुचना विद्युत अभियंत्यांना महापौरांनी दिल्या.